शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

आता पदवी अभ्यासक्रम असेल ४ वर्षांचा; येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी

By योगेश पायघन | Published: December 09, 2022 11:55 AM

चार वर्षांच्या बहुविद्याशाखीय पदवी अभ्यासक्रमास प्रवेश आणि बाहेर पडण्याची लवचिकता असेल.

- योगेश पायघनऔरंगाबाद : नव्या शैक्षणिक धोरणातील शैक्षणिक श्रेयांक पेढी, चाॅइस बेस क्रेडिट सिस्टम, मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट, मातृभाषेत परीक्षा देण्याची सुविधा यांच्या अंमलबजावणीनंतर आता तीन वर्षांत मिळणाऱ्या पदवीसाठी चार वर्षे लागणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाची रूपरेषा तयार केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा असणार आहे.

सध्या सुरू असलेला ३ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम ४ वर्षांत स्थलांतरित करणे, एकसमान शैक्षणिक अभ्यासक्रम, विधायक अध्यापनशास्त्राचा वापर, विद्यार्थिभिमुख शिक्षण आराखडा याबाबत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. राजेंद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ समितीच्या निर्देशांची २०२३-२४ या शैक्षणिक सत्रात अंमलबजावणीसंदर्भात मंगळवारी शासन आदेश जारी केला. उच्च शिक्षण विभागाच्या या आदेशात राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्कमध्ये (एनसीआरएफ) सर्व प्रमाणपत्र, पदविका, पदवी एकापेक्षा जास्त प्रवेश आणि निर्गमन पर्यायांसह, राज्य विद्यापीठे राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्कचा संदर्भ घेतील. यात राष्ट्रीय उच्च शैक्षणिक पात्रता फ्रेमवर्क, राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क आणि राष्ट्रीय शालेय शिक्षण पात्रता फ्रेमवर्कचा समावेश आहे. नव्या शैक्षणिक धोरणासंबंधी आवश्यक कायदे, अध्यादेश व नियम तयार करण्याचे आदेशही सर्व विद्यापीठाला कुलपतींनी दिले आहेत.

पदवीमध्ये प्रवेश, बाहेर पडण्याची लवचिकताचार वर्षांच्या बहुविद्याशाखीय पदवी अभ्यासक्रमास प्रवेश आणि बाहेर पडण्याची लवचिकता असेल. विविध स्तरांवर प्रवेश आणि निर्गम पर्यायांसह चार आणि पाच वर्षांच्या बहुविद्याशाखीय पदव्युत्तर पदवी कार्यक्रमांच्या रचनेविषयी स्पष्टता निर्देशात आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना १ वर्षाच्या यूजी प्रमाणपत्रासाठी किमान ४० क्रेडिट्स, दोन वर्षांनंतर यूजी डिप्लोमासाठी किमान ८० क्रेडिट्स, तीन वर्षांच्या पदवीसाठी किमान १२० क्रेडिट्स, संशोधन किंवा ऑनर्ससह पदवी चार वर्षांसाठी किमान १६० क्रेडिट्सची आवश्यकता असेल. यासंबंधी सविस्तर निर्देश उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाला दिले आहेत.

सर्वच अभ्यासक्रम ४ वर्षांचे नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भात यूजीसीने गाइडलाइन्स दिल्या आहे. कला, विज्ञान, वाणिज्य शाखेची पदवी अभ्यासक्रम पुढील वर्षांपासून ४ वर्षांचे करण्यासंदर्भात पावले उचलत आहोत. पुढील वर्षांपासून सर्वच पदवी अभ्यासक्रम ४ वर्षांचे असतील.- डाॅ. प्रमोद येवले, कुलगुरू, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद