आता लढाई कायदेशीर मार्गाने सुरू राहील; इम्तियाज जलील यांचे आंदोलन मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 16:33 IST2023-03-18T16:32:44+5:302023-03-18T16:33:10+5:30
रविवारी हिंदू संघटनांचा माेर्चा शहरात काढण्यात येणार आहे. यातील भडकाऊ भाषणांमुळे शहराचे वातावरण खराब होण्याची शक्यता आहे.

आता लढाई कायदेशीर मार्गाने सुरू राहील; इम्तियाज जलील यांचे आंदोलन मागे
छत्रपती संभाजीनगर : नामांतराच्या विरोधात खा. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मागील १४ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी खा. जलील यांनी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी जाहीर केले की, शनिवारपासून आम्ही माघार घेत आहोत.
आमची लढाई कायदेशीर मार्गाने सुरूच राहील, असेही त्यांनी जाहीर केले. रविवारी हिंदू संघटनांचा माेर्चा शहरात काढण्यात येणार आहे. या मोर्चात गरळ ओकणारे काही नेते येणार आहेत. त्यांच्या भडकाऊ भाषणांमुळे शहराचे वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी याची दखल घ्यावी. लवकरच पवित्र रमजान महिना सुरू होणार आहे, शहराचे वातावरण बिघडू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.