शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आता महामार्गावर राहुट्या

By admin | Updated: December 14, 2014 00:05 IST

मानदेऊळगाव : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती वाढत आहे. परिणामी भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. या चोऱ्यांवर नियंत्रण रहावे यासाठी चोऱ्या व लुटमारी

मानदेऊळगाव : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती वाढत आहे. परिणामी भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. या चोऱ्यांवर नियंत्रण रहावे यासाठी चोऱ्या व लुटमारी रोखण्यासाठी जालना - राजूर महामार्गावर गस्तीसाठी पोलिसांच्या राहुट्या उभारणार असल्याची माहिती चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्या आदेशानुसार या मार्गावर राहुट्या उभारणार आहेत. यात प्रामुख्याने पीरपिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, माळशेंद्रा फाटा येथे राहुटी उभारण्यासाठी येथील जागेची पाहणी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर ट्रकवर गोळीबार झाल्याची घटनाही ताजी आहे. माळशेंद्रा फाटा येथे पोलिस राहुटी उभारणार आहेत. माळशेंद्रा, वंझार उम्रद, गोंदेगाव हा मधला मार्ग थेट महामहामार्गाला मिळतो. या महामार्गावरील लूटमार अथवा इतर गुन्हेगारी आटोक्यात येण्यास मदत होणार आहे. याविषयी परिसरातील रहिवासी तसेच भीमकायदा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विलास डोळसे म्हणाले, ग्रामसंरक्षक दलाची स्थापना करुन सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी परिसरातील पोलिस पाटील बावणे, गणेश शेवाळे, संजय डोळसे, शरद डोळसे, संतोष लहाने आदींची उपस्थिती होती.या मार्गावर राहुट्या उभाराव्यात अशी परिसरातील ग्रामस्थांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. ही मागणी तसेच दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता या राहुट्या उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. राहुट्यांमध्ये शस्त्रधारी चार ते पाच पोलिसांची गस्त असणार आहे. वाटमारीचे प्रकारही यामुळे थांबण्यास मदत मिळणार आहे. दरम्यान, देऊळगावराजा महामार्गासह जिल्ह्यातील इतर महामार्गावरही राहुट्या उभारणीचे काम पोलिस दलाने हाती घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. विशेषत: जालना ते नांदेड व जालना ते बीड महामार्गावर राहुट्या उभारण्याची नितांत गरज असल्याचे मत परिसरातील अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. (वार्ताहर)४मानदेऊळगाव परिसरात उभारण्यात येणाऱ्या पोलिस राहुट्यांची पाहणी चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी केली. साधारणपणे दोन ते तीन ठिकाणी राहुट्या उभारल्या जातील, अंदाज त्यांनी व्यक्त केला. यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण राहील.