'आता सासरेबुवा रावसाहेब दानवेच जावयाला समजावून सांगतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 07:53 IST2019-02-22T07:28:16+5:302019-02-22T07:53:19+5:30

खा. खैरेंचा आ. हर्षवर्धन जाधवांना चिमटा

'Now, Sasarebuva Ravanheb will explain to you the demon' | 'आता सासरेबुवा रावसाहेब दानवेच जावयाला समजावून सांगतील'

'आता सासरेबुवा रावसाहेब दानवेच जावयाला समजावून सांगतील'

औरंगाबाद : कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांची वंचित बहुजन आघाडीशी जवळीक वाढू लागल्यामुळे त्यांचे सासरे तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हेच त्यांना समजावून सांगतील, असा चिमटा खा. चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना काढला.

खैरे म्हणाले, अशी चर्चा आहे की आ. जाधव यांच्याबाबतीत त्यांचे सासरे खा. दानवे यांना संघाच्या वरीष्ठ पातळीवरून बोलावणे आले होते. तुमचे जावई जे काही करीत आहेत, ते काही बरोबर नाही, असे संघाने दानवे यांना समजावले आहे. ‘त्या’आघाडीबाबत जाधव यांचे जे काही गुफ्तगू सुरू आहे. त्याबाबत दानवे हेच त्यांना समजावून सांगतील. संघाच्या दबावामुळेच युती झाली आहे. एकेक जागा महत्त्वाची आहे. संघाच्या या समजावण्याचा निश्चितच परिणाम होईल.

Web Title: 'Now, Sasarebuva Ravanheb will explain to you the demon'