शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

आता शाळेत वाचा गोष्टीची पुस्तके ! राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘वाचन चळवळ’ उपक्रम

By राम शिनगारे | Updated: December 21, 2023 19:02 IST

या उपक्रमामुळे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातून आठवीपर्यंतच्या मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी व आनंददायी वाचनातून ‘शिकण्यासाठी वाचू शकेल’, अशी चळवळ युनिसेफ, प्रथम बुक्स व रीड इंडिया यांच्यासह राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविली जाणार आहे. 

तिसरीपर्यंतच्या प्रत्येक मुलामध्ये वाचन कौशल्य निर्माण करतानाच वयोगटानुसार मुलांना मराठी भाषेतील दर्जेदार साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यातून त्यांच्यावर चांगले संस्कार होतानाच मराठी भाषेचा नवीन वाचक वर्ग देखील तयार होईल, मुलांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवण होईल, हा योजनेचा उद्देश असल्याचेही २२ नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयात म्हटले आहे.

काय आहे वाचन चळवळ?दर आठवड्याला दोन तासिका : दर आठवड्यात दोन तास वाचन तासिका शाळेत घेण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन शाळेतील मुख्याध्यापकांना करावी लागणार आहे. त्यासाठी डिजिटल प्लॅटफाॅर्मचाही वापर केला जाणार आहे.

गोष्टींचा वार शनिवार : गोष्टीचा वार शनिवार ठेवण्यात आला आहे. या दिवशी शासनाकडून शाळांना ई-पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही पुस्तके सर्वच भाषांतून असणार आहेत.

ॲप, डिजिटल वापर : उपक्रमास गती देण्यासाठी ब्रँड अँबेसेडर नेमणे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, ॲप, मीडिया प्लॅटफॉर्मचा सहभाग घेणे व लोकांच्या प्रयत्नांना प्रसिद्धी देण्याचे काम केले जाईल.

पुस्तकांचे प्रदर्शन : या उपक्रमात स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शाळांमध्ये पुस्तकांचे प्रदर्शन, ग्रंथोत्सव असे कार्यक्रम घेण्यात येतील. त्याशिवाय वक्तृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा भरविण्यात याव्यात, एक ते दोन मिनिटांचे व्हिडीओ करून ते योग्य ठिकाणी अपलोड करण्यास प्रोत्साहित केले जाईल.

जिल्ह्यात शाळा किती?जि. प. शाळा : २०८०खासगी व्यवस्थापन शाळा : २४९१

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासया उपक्रमामुळे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास आणि समृद्ध होण्यास मदतच होणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचा शालेय शिक्षण विभाग परिश्रम घेत आहे.- जयश्री चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प. छत्रपती संभाजीनगर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणSchoolशाळा