शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

आता मोघम ‘नमुना आठ’ वर बसणार चाप

By admin | Updated: December 20, 2015 23:34 IST

आखाडा बाळापूर : ग्रामपंचायमधील नमुना नंबर आठची नक्कल देताना ती सुरुवातीला मोघम स्वरुपात दिली जायची, परंतु यापुढे असे मोघम स्वरुपातील नक्कल देऊ नये,

आखाडा बाळापूर : ग्रामपंचायमधील नमुना नंबर आठची नक्कल देताना ती सुरुवातीला मोघम स्वरुपात दिली जायची, परंतु यापुढे असे मोघम स्वरुपातील नक्कल देऊ नये, त्यात मोजमाप, क्षेत्रफळ, व चतु:सीमा यांचा उल्लेख केलाच पाहिजे, असे सक्तीचे आदेश कळमनुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्लॉटमालक, जागामालक यांनी त्यांच्या मालकीहक्काचे विवरण करणारे, नमुना नंबर आठची नक्कल ग्रामपंचायत कार्यालयामार्फत देण्यात येते. ती नक्कल देताना ती मोघम स्वरुपात दिली जाते असे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्या नक्कलमध्ये जागेचे मोजमाप लिहिले जात नाही. जागेचे क्षेत्रफळ, त्याच्या चतु:सीमा याचा उल्लेख केल्यास त्या जागेबाबतची स्पष्टता दिसते. पण नमुना नंबर आठची नक्कल देताना ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी काम टाकण्यासाठी किंवा जागेबाबत संदिग्धता असल्याने मोघम स्वरुपात नक्कल देवून समोरच्याची बोळवण करतात. परिणामी, जागेबाबतचे अनेक वाद प्रशासनापुढे उभे राहतात. त्यासंबंधी १६ नोव्हेंबरच्या लोकशाही दिनात प्रश्न उपस्थित झाला होता. त्या अनुषंगाने कळमनुरी तहसीलदारांनी नमुना नंबर ८ मध्ये सर्व नोंदी असल्या -शिवाय, नमुना नंबर ८ ची नक्कल देवू नये असे आदेश दिले होते. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामविकास अधिकारी- ग्रामसेवक यांना आदेश दिले असून, सर्व नोंदीची नक्कल देण्यास सूचविले आहे. त्यामुळे आता जागेचे घोळ करणाऱ्यांची पंचाईत होणार आहे.