शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
3
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
4
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
5
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
6
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
7
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
8
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
9
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
10
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
11
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
12
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
13
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
14
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
15
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
16
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
17
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
18
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
19
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
20
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर

आता सकाळी मोकळ्या हवेत फिरा बिनधास्त; जाणून घ्या छत्रपती संभाजीनगर एअर क्वालिटी

By साहेबराव हिवराळे | Published: February 15, 2024 1:44 PM

कारखान्यातून निघणारा धूर आता कमी झाला आहे. औद्योगिक क्षेत्रात बॉयलर कमी झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : आपल्या शहरातील हवेची गुणवत्ता कशी आहे? या गुणवत्तेचा आणि आजाराचा काय संबंध? असा विचार केल्यास औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण पसरविणाऱ्या कारखान्यानेच आता गुणवत्तेची कास पकडलेली असून प्रदूषणाचा आलेख-इंडेक्स स्तर पार ६० वर येऊन ठेपला आहे. त्यामुळे प्रदूषणामुळे आजारी पडणाऱ्यांची संख्याही आता रोडावली आहे. सकाळच्या मोकळ्या हवेचा फायदा घेत मॉर्निंग वॉक करण्यास काहीच हरकत नाही.

धूर झाला कमी शहरात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने वाळूज व शहरासह ५ ठिकाणी शहराची एअर क्वालिटी आता ६०वर जाऊन पोहोचली आहे. कारखान्यातून निघणारा धूर आता कमी झाला आहे. औद्योगिक क्षेत्रात बॉयलर कमी झाले आहेत.

इंडेक्स १०० पेक्षा कमीइंडेक्स १०० पेक्षा कमी असल्याने तसेच तो ६०पर्यंत जाऊन पोहोचला असल्याने प्रदूषणमुक्तीच्या दिशेनेे वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे आजाराचे प्रमाण एकदम घटले आहे.

का वाढला एअर क्वालिटी इंडेक्स? धूळ : शहरात बांधकाम केलेल्या रस्त्याची सफाई रोज होत आहे.

वायू प्रदूषण : आरटीओ व पोलिस प्रशासनाच्या कारवाईमुळे प्रदूषण पसरविणाऱ्या मोटारसायकल चालकांवर कारवाई होत आहे. त्याचाही सकारात्मक परिणाम होत आहे.

कर्णकर्कश हॉर्न : काही दिवसांपासून वाहनांचे हॉर्न जोराने वाजविले जात होते. पण त्यांच्यावरही कारवाया होत असल्याने ध्वनीप्रदूषण कमी झाले आहे.

अधिक उत्तम वातावरणास झाडे लावा..मानवाला उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी शुद्ध हवेची नितांत गरज आहे. वातावरणातील बदलासाठी प्रत्येकाने झाडे लावावीत, असा संकल्प करणे गरजेचे आहे. - प्रकाश जाधव, पर्यावरण प्रेमी

झाड लावून वाढदिवस साजरा कराआता प्रत्येकाने केक कापण्यापेक्षा झाड लावून ते जपण्याचा प्रयत्न करावा. - मनोज गायकवाड 

प्रदूषणमुक्त जगा..शहरातील आवडी निवडी वाढत असून, स्वत:चे आरोग्य उत्तमरित्या जगण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. पर्यावरण उत्तम राहावे व कायम टिकून राहावे यासाठी हिरवळ निर्माण करणे गरजेचे आहे. : डॉ. एस. पी. मोहिते

शहराचे आरोग्य जपलेशहरात एअर क्वालिटी इंडेक्स जपलेला असून, पाच ठिकाणी जनतेला शहराचा इंडेक्स पाहता येतो.- प्रकाश मुंढे, उपप्रादेशिक अधिकारी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादair pollutionवायू प्रदूषण