शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

आता वाहतूक नियम तोडणाऱ्यांना देणार ई-चालान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 15:44 IST

दंडाची रक्कम जागेवरच वसूल केली जाणार आहे. 

- बापू सोळुंके

औरंगाबाद : वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांना एप्रिलपासून थेट ई-चालान मिळणार आहे. एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड स्वॅप करून वाहनचालकांकडून ई-चालानच्या माध्यमातून दंडाची रक्कम जागेवरच वसूल केली जाणार आहे. 

याविषयी अधिक माहिती अशी की, वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या चालकांवर वाहतूक शाखेकडून दंडात्मक  कारवाई केली जाते. वाहनचालकांना कागदी चालान देऊन वाहतूक शाखेच्या कार्यालयात पाठवून तेथे दंड भरून घेतला जाते. दंड भरल्याची पावती पोलिसांकडून वाहनचालकाला  मिळते. ही पावती दाखविल्यानंतर कारवाई करणारे पोलीस जप्त लायसन्स परत करतात. यासोबतच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे आणि मोबाईलवर छायाचित्र काढून घरपोच दंडाची पावती पाठविण्याचे कामही सेफ सिटी विभागाकडून सुरू आहे.

घरपोच पावती प्राप्त झाल्यानंतर बँकेत अथवा पोस्ट कार्यालयात दंड भरण्याची व्यवस्था करण्यात आली. असे असले तरी शासनाने मात्र आता कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य दिले आहे. वाहतूक पोलिसांनी दंडाची रक्कमही आता ई- चालान पद्धतीने भरून घ्यावी, असा आदेश पोलीस महासंचालकांनी दिला. त्यानुसार सोमवारपासून शहर वाहतूक विभागातील सहायक पोलीस आयुक्त ते पोलीस शिपाई यांना ई-चालानचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांकडून नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठवड्यापासून दंडाची रक्कम ई-चालान पद्धतीने वसूल केली जाणार आहे. वाहनचालकांकडून एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड अथवा डेबिट कार्ड स्वॅप करून दंड भरून घेतला जाणार आहे.

काय असेल ई-चालानमध्येवाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकाला वाहतूक पोलिसांनी पकडल्यानंतर ई-चालान यंत्रात वाहनाचा क्रमांक, वाहनचालकाचा लायसन्स क्रमांक, संपूर्ण नाव, पत्ता, वाहतूक नियम मोडल्याचे ठिकाण, तारीख आणि ठिकाण याबाबतची माहिती वाहतूक पोलीस टाकतील. ही माहिती ई-चालान सॉफ्टवेअरमध्ये कायमस्वरूपी साठवून ठेवली जाईल. यामुळे वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकाने यापूर्वी किती वेळा वाहतूक नियम मोडले हे एका क्लिकवर समजणार आहे.   

उद्यापासून होणार अंमलबजावणीपोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे म्हणाल्या की, १ एप्रिलपासून ई-चालानची अंमलबजावणी होणार आहे. याकरिता सहायक पोलीस आयुक्त, पाच पोलीस निरीक्षक, ११ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि ३२० वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना ई-चालानचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण दोन दिवसांत पूर्ण होईल.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAurangabadऔरंगाबादtraffic policeवाहतूक पोलीस