आता रुग्णांची गैरसोय टळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:51 IST2017-08-30T23:51:01+5:302017-08-30T23:51:01+5:30
जिल्ह्यातील विविध रुग्णालयातील वर्ग ३ व ४ ची असे एकूण २८४ पदे भरली आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत संबंधित उमेदवारांकडून अर्ज भरुन घेण्याची प्रक्रिया सुरु होती. हे पदे भरली मात्र डॉक्टरांच्या रिक्त पदाचे काय?असा सवाल होत आहे.

आता रुग्णांची गैरसोय टळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील विविध रुग्णालयातील वर्ग ३ व ४ ची असे एकूण २८४ पदे भरली आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत संबंधित उमेदवारांकडून अर्ज भरुन घेण्याची प्रक्रिया सुरु होती. हे पदे भरली मात्र डॉक्टरांच्या रिक्त पदाचे काय?असा सवाल होत आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात मनुष्यबळा अभावी रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. एवढेच काय तर रुग्णांना कधी काळी अर्ध्यावर उपचार सोडूनही परतावे लागत होते. आता मात्र ही वेळ तूर्तास टळण्यास मदत होणार आहे.
औरंगाबाद येथे सात दिवसांपूर्वी भरती प्रकिया पूर्ण झाली. मात्र सलग सुट्ट्या असल्याने उमेदवार येऊ शकले नाहीत. त्यामुळे सोमवारी दुपारपासून या उमेदवारांची रुग्णालयात एकच गर्दी झाली होती. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, वसमत येथील उपजिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालय, औढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालय, आ. बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालय, कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालय, राज्य राखील पोलीस बल गट क्र. १२ हिंगोली, या ठिकाणी वर्ग ३ व ४ ची पदे भरण्यात आली आहेत. त्यामुळे या ठिकाणी उपचारासाठी येणाºया रुग्णांची गैरसोयी पासून सुटका होणार आहे. तसेच पदे भरण्यात आल्यामुळे पूर्वी कार्यरत असलेल्या वर्ग ३ व ४ मध्ये समाधान व्यक्त होत आहे.
आता त्यांच्यावरीलही कामाचा भर कमी होण्यास मदत होणार आहे. विविध रुग्णालयातील वर्ग ३ व ४ ची पदे भरले जात असले तरी विविध डॉक्टरांची रिक्त असलेल्या पदामुळे व कार्यरत असलेल्या डॉक्टरांचे स्वत:चे दवाखाने असल्याने रुग्णांना ताटकळत बसण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे याकडेही जरा आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरुन डॉक्टरांच्या प्रतीक्षेत ताटकळत बसलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार होऊन त्याला आपल्या घरी परतता येईल.