आता वेध बंपर ‘लोकमत महाएक्स्पो’चे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:39 IST2018-01-23T00:39:49+5:302018-01-23T00:39:56+5:30
दैनंदिन वापरातील छोट्या-मोठ्या वस्तूंपासून ते चारचाकी आणि स्वप्नातील घरापर्यंत सर्वच गरजा पूर्ण करणारे ‘लोकमत महाएक्स्पो’आता चर्चेचा विषय बनला आहे. एसएफएसच्या मैदानावर २५ ते २९ जानेवारीदरम्यान होणा-या या महाप्रदर्शनाचे सर्वांनाचा वेध लागले आहेत.

आता वेध बंपर ‘लोकमत महाएक्स्पो’चे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भव्य-दिव्य कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या लोकमत समूहाने औरंगाबादकरांसाठी एक आगळावेगळा महोत्सव आयोजित केला आहे. दैनंदिन वापरातील छोट्या-मोठ्या वस्तूंपासून ते चारचाकी आणि स्वप्नातील घरापर्यंत सर्वच गरजा पूर्ण करणारे ‘लोकमत महाएक्स्पो’आता चर्चेचा विषय बनला आहे. एसएफएसच्या मैदानावर २५ ते २९ जानेवारीदरम्यान होणा-या या महाप्रदर्शनाचे सर्वांनाचा वेध लागले आहेत.
शॉपिंग उत्सव, इलेक्ट्रो एक्स्पो, आॅटो एक्स्पो, प्रॉपर्टी शो, फर्निचर आणि इंटेरिअर एक्स्पो, अशा पाच प्रदर्शनांचा एकाच छताखाली लाभ घेण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. ३०० स्टॉल्सच्या या महाप्रदर्शनामधून स्थानिक व्यावसायिकांनाही चालना मिळणार आहे. घोषणा झाल्यानंतर अल्पावधीत व्यावसायिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला असून, मोजकेच स्टॉल्स शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांनी आजच आपले स्टॉल्स बुक करून या बहुचर्चित उपक्रमात सहभागी होण्याची संधी गमावू नये. ग्राहकांसाठी फूड झोन आणि लहान मुलांच्या मनोरंजनासाठी प्ले झोनदेखील असणार आहे.