शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

यापुढे एकटेच लढणार आणि जिंकणार! उद्धव ठाकरेंकडून स्वबळाचा पुनरुच्चार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2018 2:26 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा स्वबळाचा पुनरुच्चार केला. यापुढे प्रत्येक निवडणुकीत एकटेच लढणार आणि निवडणूक जिंकणार, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद -  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा स्वबळाचा पुनरुच्चार केला. यापुढे प्रत्येक निवडणुकीत एकटेच लढणार आणि निवडणूक जिंकणार, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शरद सहकारी साखर कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना ठाकरे यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. 25 वर्ष भाजपला सांभाळले. प्रत्येक वेळी मदत केली. मात्र आता एकटेच लढणार आणि एकटेच विजयी होणार आहोत. नुकसान कोणाचे होणार हे कळलेच. घरात घुसायला लागलात. आता सोडणार नसल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.शिवसेनेने राज्यात सर्वात अगोदर  शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शेतकरी हा विषय शहरात मांडला. कारण शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याला कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट शिवसेनेचे आहे. जी काही शेतकऱ्यांना मदत मिळाली. ती शिवसेनेमुळेच मिळाली असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.2022 पर्यंत राहणार का?केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडला आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांना हे देणार, ते देणार, दुप्पट उत्पन्न करणार हे सगळं खरंय पण तुम्ही राहणार आहात का? तुमचा निकाल जनताच लावणार आहे. नुसत्याच घोषणा केल्या जात आहेत. अंमलबजावणीचा पत्ता नाही. सौभाग्य योजना, उज्जवला योजना अशा योजनांची संख्या मोजा, आपणाला आठवणार नाहीत. पण नुसत्याच घोषणा. यामुळे आता एकटी शिवसेना एकहाती सत्ता मिळवेल आणि विकासाची गंगा शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले, असेही ठाकरे म्हणाले. डल्ला मारणारे हल्लाबोल करताहेतसध्या काहीजण रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेना सत्तेत असून विरोधाची भूमिका घेत असल्याची टीका करतात.पण स्वतःसाठी कधीतरी टीका केली का? जनतेसाठीच टीका करत आहोत. परंतु हे डल्ला करणारेच हल्लाबोल करत आहेत, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली.भाषण अर्ध्यावर सोडावं लागलंउद्धव ठाकरे यांनी भाषण करण्यासाठी सुरुवात केली. मात्र जनरेटर सतत बंद पडत असल्यामुळे अर्ध्यावर सोडून द्यावे लागले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण