कुख्यात गुन्हेगार कलीम उर्फ कल्ल्या दोन वर्षांसाठी तडीपार

By राम शिनगारे | Updated: May 4, 2023 21:29 IST2023-05-04T21:29:17+5:302023-05-04T21:29:25+5:30

छत्रपती संभाजीनगर : रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार कलीम उर्फ कल्ल्या खान शब्बीर खान (३५, रा. छोटा मुरलीधरनगर) यास पोलिस उपायुक्त ...

Notorious criminal Kalim alias Kallya out of city for two years | कुख्यात गुन्हेगार कलीम उर्फ कल्ल्या दोन वर्षांसाठी तडीपार

कुख्यात गुन्हेगार कलीम उर्फ कल्ल्या दोन वर्षांसाठी तडीपार

छत्रपती संभाजीनगर : रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार कलीम उर्फ कल्ल्या खान शब्बीर खान (३५, रा. छोटा मुरलीधरनगर) यास पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार केले. या विषयीचा प्रस्ताव उस्मानपुराच्या निरीक्षक गिता बागवडे यांनी दिला होता.

उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणारा कलीम उर्फ कल्ल्या हा मागील काही दिवसांपासून अवैध दारू विक्रीच्या धंद्यात उतरला होता. त्याच्या विरोधात अवैध दारू विक्रीचे तब्बल १२ गुन्हे दाखल आहेत. अवैध दारू विक्रीपूर्वी त्याने घरफोड्या केल्या आहेत. त्याशिवाय त्याच्या विरोधात मारहाण, विनयभंगासारखेही गुन्हे दाखल आहेत.

त्याच्या वाढत्या गुन्ह्यांची दखल घेत निरीक्षक गिता बागवडे यांनी त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त नांदेडकर यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार कलीम उर्फ कल्ल्या यास दोन वर्षांसाठी शहरातुन हद्दपार करण्याचा आदेश काढण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Web Title: Notorious criminal Kalim alias Kallya out of city for two years