शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाशे प्राध्यापकांना नोटिसा

By admin | Updated: December 19, 2014 00:59 IST

औरंगाबाद : कुचराईपणा करणाऱ्या चार जिल्ह्यांतील प्राध्यापक, सहकेंद्रप्रमुख, भरारी पथकातील सदस्य व भरारी पथकांच्या अध्यक्षांसह १२५ जणांना परीक्षा विभागामार्फत कारणे दर्शक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद : परीक्षेचे काम आणि उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात कुचराईपणा करणाऱ्या चार जिल्ह्यांतील प्राध्यापक, सहकेंद्रप्रमुख, भरारी पथकातील सदस्य व भरारी पथकांच्या अध्यक्षांसह १२५ जणांना परीक्षा विभागामार्फत कारणे दर्शक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यासंदर्भात परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांसाठी विद्यापीठाने सहकेंद्रप्रमुख, भरारी पथके तैनात केली होती. त्यांना परीक्षेचे कामकाज चोखपणे बजावण्यासाठी लेखी आदेशाबरोबर मोबाईलवरून सातत्याने संदेशही पाठविण्यात आले. तरीदेखील अनेक सहकेंद्रप्रमुख तसेच भरारी पथकातील सदस्य व काही अध्यक्षांनी परीक्षेच्या कामाकडे दुर्लक्ष केले. दुसरीकडे विद्यापीठासह जिल्ह्याच्या ठिकाणी उत्तरपत्रिका मूल्यांकन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षेचा निकाल वेळेत लावण्यासाठी सर्व जिल्ह्यांतील महाविद्यालयांच्या पात्र प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी लेखी तसेच तोंडी आदेश बजावण्यात आले होते. तरीदेखील अनेक प्राध्यापक हे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी मूल्यांकन केंद्राकडे फिरकले नसल्याचे परीक्षा विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आज गुरुवारी परीक्षा विभागाने संबंधित कामचुकार प्राध्यापकांना विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या ३२(५)(ग) कलमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवून शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, या आशयाची नोटीस बजावली आहे. संबंधित कामचुकार प्राध्यापकांनी नोटिसेचा खुलासा प्राचार्यांमार्फत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.