शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

खंडपीठाची परिवहन आयुक्तांना नोटीस

By admin | Updated: July 23, 2014 00:40 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यातील कलम ५६ नुसार प्रत्येक जडवाहनाला फिटनेस प्रमाणपत्रासाठी द्याव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या चाचण्यांतून व्हील अलायनमेंटची अट रद्द करण्यात आली.

औरंगाबाद : महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यातील कलम ५६ नुसार प्रत्येक जडवाहनाला फिटनेस प्रमाणपत्रासाठी द्याव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या चाचण्यांतून व्हील अलायनमेंटची अट रद्द करण्यात आली. त्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहित याचिकेत न्यायालयाने परिवहन आयुक्तांना नोटीस काढण्याचे आदेश दिलेआहेत.परिवहन अधिकाऱ्यांना महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यातील कलम ५६ नुसार जड वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र द्यावे लागते. त्यासाठी त्यांना मान्यताप्राप्त केंद्राकडून कोणत्या चाचण्या करणे आवश्यक आहे, याची सूची दिली आहे. या सूचीमध्ये नियम १ (सी) मध्ये व्हील अलायनमेंट करणे बंधनकारक आहे. राज्याच्या परिवहन आयुक्तांनी ६ जानेवारी २०१३ रोजी परिपत्रकाद्वारे मोटार वाहन कायद्यातील कलम ५६ प्रमाणे फिटनेस प्रमाणपत्र जारी करताना कलम ४५ (१) मधील व्हील अलायनमेंट करणे बंधनकारक नाही, असे नमूद केले. व्हील अलायनमेंटची तरतूद कमी करण्यात आल्याचे परिपत्रक सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयांना पाठविण्यात आले आहे. या निर्णयामुळे नाराज झालेले इफ्तेकार अहेमद खान यांनी अ‍ॅड. विश्वजित जैन यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका सादर केली होती. ही याचिका न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. व्ही.एल. आंचलिया यांच्यासमोर सुनावणीसाठी आली असता व्हील अलायनमेंटमुळे वाहनाची दोन्ही चाके समांतर रेषेत ठेवण्यास मदत होते.परिणामी, वाहन एका बाजूने कलणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असल्याचे अ‍ॅड. जैन यांनी न्यायालयास सांगितले. न्यायालयाने प्रतिवादी महाराष्ट्र शासन, परिवहन आयुक्त यांना नोटिसा काढून याचिकेची पुढील सुनावणी ८ आॅगस्ट रोजी ठेवली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी लोकअभियोक्ता एस. व्ही. कुरुंदकर काम पाहत आहेत.