शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

‘निर्भया निधी’ अखर्चितप्रकरणी केंद्र, राज्याच्या प्रधान सचिवांना खंडपीठाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 14:26 IST

महाराष्ट्रात १५० कोटींचा ‘निर्भया निधी’ खर्च न झाल्याप्रकरणी ‘सुमोटो’ याचिका दाखल 

ठळक मुद्देयाचिकेसोबतच्या नोंदी पाहता खंडपीठाने चिंता व्यक्त केली.

औरंगाबाद : महाराष्ट्रात १५० कोटींच्या निर्भया निधीपैकी एक रुपयासुद्धा खर्च न केल्यासंदर्भात ‘सुमोटो याचिकेची’ गंभीर दखल घेत औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न बी. वराळे आणि न्या. अनिल एस. किलोर यांनी मंगळवारी (दि.१७) केंद्र आणि राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिवांसह राज्य शासनाच्या गृह विभागाचे प्रधान सचिव आणि औरंगाबादचे पोलीस आयुक्त यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला. वरील अखर्चित निधीच्या अनुषंगाने खंडपीठाने आदेशात अनेक प्रश्न विचारले असून, प्रतिवादींनी ६ आठवड्यांत त्या प्रश्नांची समर्पक उत्तरे शपथपत्राद्वारे दाखल करावीत, असे आदेशात म्हटले आहे. 

देशभरात महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या वाढलेल्या घटनांना आळा बसावा आणि महिलांना सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने दिलेल्या १५० कोटींच्या ‘निर्भया निधी’पैकी एक रुपयासुद्धा महाराष्ट्रात  खर्च केला गेला नसल्याच्या महाराष्ट्र महिला व बालकल्याण आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या वक्तव्याच्या वृत्ताची गंभीर दखल घेत खंडपीठाने ‘त्या’ वृत्तालाच ‘सुमोटो याचिका’ म्हणून दाखल करून घेत अ‍ॅड. अंजली बाजपेयी-दुबे यांची ‘अमिकस क्यूरी’ म्हणून नेमणूक केली होती. अ‍ॅड. दुबे यांनी वरील याचिका खंडपीठात सादर केली. त्यात त्यांनी २०१२ साली दिल्ली येथे एका तरुणीवरील सामूहिक अत्याचार आणि तिच्या दुर्दैवी मृत्यूनंतर देशभरात उफाळलेल्या प्रक्षुब्ध भावनांचा आणि तीव्र निषेधाचा विचार करून केंद्र शासनाने विविध प्रतिबंधात्मक उपायांसह कायद्यामध्ये सुधारणा केली होती. केंद्र शासनाने या पार्श्वभूमीवर ‘निर्भया निधी’ची घोषणा करून २०१३ सालच्या अर्थसंकल्पात १ हजार कोटींची तरतूद होती. ती २०१८-१९ मध्ये ३,६०० कोटी रुपये झाली आहे.

निधी खर्च न करणे ही दुर्दैवी आणि गंभीर बाबयाचिकेसोबतच्या नोंदी पाहता खंडपीठाने चिंता व्यक्त केली. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ यांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, तर दुसरीकडे महिलांची सुरक्षा, प्रतिबंधात्मक उपाय आणि पीडितांच्या साहाय्यासाठी उभारलेल्या ‘निर्भया निधी’चा महाराष्ट्रात अजिबात वापर केला नाही, ही दुर्दैवी आणि गंभीर बाब असल्याचे मत खंडपीठाने व्यक्त केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठState Governmentराज्य सरकारfundsनिधी