शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ना लखलखता प्रकाश, ना दिव्यांची आरास; आमची दिवाळी असते रानावनात मेंढ्यांच्या कळपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 19:10 IST

उघड्या रानावनात आभाळाच्या छप्पराखाली व रात्रीच्या अंधारातच त्यांची दिवाळी येते आणि जाते

ठळक मुद्देजुने कपडे... अन् त्यालाही ठिगळं...!

- रघुनाथ सावळेउंडणगाव : दिवाळी म्हटले की, आनंदाचा महोत्सव शहर असो की गाव, सगळीकडे आनंदाला उधाण आलेले असते. मात्र, पिढ्यानपिढ्या दारिद्र्यात पिचलेल्या व गावोगाव मेंढ्या घेऊन भटकंती करणारा धनगर समाज या आनंदापासून वर्षानुवर्षे वंचित आहे. 

गाव सोडून रानावनात मेंढ्यांच्या सान्निध्यातच त्यांची दिवाळी पार पडते. ना फटाके ना नवीन कपडे, ना लखलखता प्रकाश ना दिव्यांची आरास. उघड्या रानावनात आभाळाच्या छप्पराखाली व रात्रीच्या अंधारातच त्यांची दिवाळी येते आणि जातेही, मेंढरे व आपले काम भले यातच जीवन व आनंद सामावलेला असल्याचे ते आजही समजतात. दिवाळीसाठी सर्वच बाजारपेठांमध्ये काही दिवसांपासून धामधूम सुरू आहे. २१ व्या शतकातील मनुष्य हा चंद्रावर जाऊन आला आहे. जगामध्ये अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडू लागल्या आहेत. मात्र, या सर्व घडामोंडीपासून मागासलेल्या ‘धनगर’ समाज आजही कोसोदूर आहे. त्यांना जगाशी काहीही घेणे- देणे नाही. दिवाळी व पाडवा सणानिमित्त सर्वत्र आनंद संचारलेला असताना नेहमी जंगलात जीवन जगणाऱ्या मागासलेल्या ‘धनगर’ समाजाचे सर्व दिवस हे सारखेच असतात.

उघड्या रानावनात चूल पेटली की, त्या प्रकाशात जेवण करून घेणे व नंतर अंधारातच मेंढरांचा संभाळ करणे यातच ‘अपुलं जीवन - मरण समावलेलं आहे रं गड्या....!’ असे म्हणून धनगर समाजाचे मेंढपाळ हे दिवाळी सण साजरा करीत असतात. प्रवाहापासून कोसोदूर असलेल्या  धनगर समाजाने आता एसटी प्रवर्गात आरक्षणासाठी लढाई सुरू केली आहे. मात्र, या लढाईत शिकलेला किंवा एकाच ठिकाणी स्थायी झालेले समाजबांधवच पुढाकार घेत आहेत. रानावनात मेंढ्या घेऊन भटकणारा समाज आजही यापासून खूप दूर आहे. आमच्या समाजात नेमका ‘प्रकाश’ कधी पडेल, असा प्रश्न आता या समाजातील शिकलेले तरुण व्यक्त करू लागले आहेत. 

जुने कपडे... अन् त्यालाही ठिगळं...!दिवाळीनिमित्त सर्वच जण नवीन कपडे घेऊन आनंदोत्सव साजरा करतात. मात्र, आमच्या नशिबी आठराविश्वे दारिद्र्य व नीट पोटाला भाकरही मिळत नाही. आमच्या अनेक लेकरांचे बालपणही मेंढरांसोबतच रानावनात जाते. अनेक दिवस नातेवाईक भेटत नाहीत. अंगावरील फाटक्या कपड्यांना ठिगळांचा आधार दिलेला असतो. आमची दिवाळी ही अशीच येते आणि जाते. संपूर्ण आयुष्यात ऐशआराम, लखलखाट काय असतो, याच्या जवळ कधीच गेलो नाही. अशी खंत या समाजातील बाळू शंकर सावळे या मेंढपाळाने व्यक्त केली.

टॅग्स :forestजंगलDiwaliदिवाळी 2022Aurangabadऔरंगाबाद