शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

हॉटेल, रेस्टॉरंटची तपासणीच नाही; वडा, समोसे पोट तर बिघडवणार नाहीत ना?

By साहेबराव हिवराळे | Updated: April 21, 2023 17:17 IST

लोकसंख्येच्या तुलनेत तालुक्याला प्रत्येकी एक अधिकारी असला तरी चारजणांवर अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याची अन्न सुरक्षा आठ अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असून, हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या २५ हजारांपेक्षा अधिक दुकानांची संख्या आहे. सध्या यात्रा उत्सवाची धूम सुरू असल्याने गावपातळीवर खाद्यपदार्थांची वडा पाव, समोसे, भजी विक्रीची दुकाने लावली जात आहेत. त्यांच्याकडे वापरात येणाऱ्या तेलाची गुणवत्ता (टीपीसी) किती, हे अन्न औषधी प्रशासनाने विभाग तपासण्याची गरज आहे.

आरोग्याच्या दृष्टीने ते खाद्यपदार्थ नुकसानदायी ठरू नये, यासाठी जनजागृती करीत आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटची तपासणीच नाही; असे म्हणता येत नाही, तर वडा, समोसे पोट तर बिघडवणार नाही ना, याची काळजी घेणे गरजेचे आहे. लोकसंख्येच्या तुलनेत तालुक्याला प्रत्येकी एक अधिकारी असला तरी चारजणांवर अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे. कर्मचारी, अधिकारी यांची नियुक्ती वाढविण्याची गरज आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाखजिल्ह्याची ३० लाखांपर्यंत लोकसंख्या असून, तालुक्याची जबाबदारी एकावर आहे. सध्या ५ जण जिल्ह्यात कार्यरत असून, तीन ते चार जणांवर अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे. प्रत्येक तालुक्यात अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकाने २५ हजारजिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंट, तसेच खाद्यपदार्थ विक्री करणारी जवळपास २५ हजारांवर दुकाने आहेत. खाद्यपदार्थाची तपासणी दर आठवड्यास साधारणपणे दोनशे ठिकाणी होते.

तपासणीसाठी केवळ पाच अधिकारीजिल्हाभरात कार्यालयात आठ अधिकाऱ्यांची संख्या असून, केवळ पाच अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आलेली आहे. अतिरिक्त जबाबदारी तीन ते चार अधिकाऱ्यांवर आहे. ही संख्या वाढवण्याची गरज आहे.

एका अधिकाऱ्यावर हजार दुकानांचा भारशहर व तालुक्यातील दुकानाची आकडेवारी लक्षात घेता एका अधिकाऱ्यावर हजाराच्या जवळपास दुकानाचा भार येतो. टीपीसी तपासणीचे काम अधिकारी करतात.

तपासणीशिवाय अन्न निरीक्षकांवर इतर कामांचा व्यापअन्न निरीक्षकांना खाद्यपदार्थ तपासणीची कामे आहेतच; त्याशिवाय अधिकाऱ्यांवर कागदी पाठपुरावा देखील करावा लागतो. इतरही विचारलेली माहिती द्यावी लागते.

आरोग्याची काळजी महत्त्वाची२५ हजारांवर दुकाने असून, त्यापैकी बहुतांश दुकानांची तपासणी करणेदेखील शक्य होत नाही. जनजागृतीवर भर दिला आहे. आपण खातो ते अन्न गुणवत्तापूर्वक आहे का, हे पाहूनच त्याचे सेवन करावे.-अजित मैत्रे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न