शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

दुरुस्तीसाठी ठोस पाऊले नाहीत; ९०० मिमी जलवाहिनीवरील लिकेज जशास तसे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 19:39 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष

छत्रपती संभाजीनगर : शहराला अतिरिक्त पाणी मिळावे, या हेतूने अलीकडेच टाकण्यात आलेल्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर गेवराई गावाजवळ लिकेज आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एकदा लिकेज बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी झाला. पाण्याच्या गळतीमुळे मुख्य रस्त्यावर चिखलच चिखल झाला आहे. लिकेज बंद करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल अधिकारी उचलायला तयार नाहीत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत शहराला अतिरिक्त पाणी मिळावे म्हणून युद्धपातळीवर ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. जलवाहिनीतून दररोज ७५ एमएलडी पाणी फारोळा येथे अपेक्षित आहे. मागील सहा महिन्यांपासून १० ते १२ एमएलडी पाणी येत आहे. फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करण्यात १ वर्षे वाया गेले. मजिप्रा अधिकाऱ्यांचे हे मोठे अपयश आहे. जलवाहिनी उभारणीत अनेक तांत्रिक दोष आहेत. त्याचे ऑडिटही करणे गरजेचे आहे. सर्व प्रकारचे टेस्टिंग रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतरच संबंधित कंत्राटदाराला बिल अदा करायला हवे.

नागरिकांना त्रासच त्रास१) जलवाहिनीवर अनेक ठिकाणी लहान-मोठे लिकेज आहेत. त्याकडे संबधित कंत्राटदार दुर्लक्ष करीत आहेत.२) गेवराई येथील लिकेजसंदर्भात वारंवार संबधित अधिकाऱ्यांना नागरिकांनी सांगितल्यानंतरही लिकेज बंद करायला तयार नाहीत.३) लिकेजमुळे मुख्य रस्त्यावर वाहने चिखलात अडकत आहेत. दुचाकी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय. रात्री अंधारात चिखल दिसत नाही.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका