महापालिका १६ टन कचऱ्याच्या मशीन स्वतः चालविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:14 IST2021-02-05T04:14:56+5:302021-02-05T04:14:56+5:30
राज्य शासनाने कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी १४८ कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून चिकलठाणा येथे ...

महापालिका १६ टन कचऱ्याच्या मशीन स्वतः चालविणार
राज्य शासनाने कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी १४८ कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून चिकलठाणा येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू आहे. पडेगाव येथेही १५० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प सुरू आहे. ३०० मेट्रिक टन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया करण्यात येत आहे. शहरात दररोज ४०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. १०० मेट्रिक टन कचरा पडून राहतो. शहरात कचरा कोंडी निर्माण झालेली असताना, महापालिकेने तब्बल एक कोटी रुपये खर्च करून तीन छोट्या मशीनची खरेदी केली होती. एका खासगी कंत्राटदाराला प्रक्रिया करण्यासाठी काम देण्यात आले होते. अल्पावधीत हे काम बंद पडले. कंत्राटदाराला देण्यात आलेले काम रद्द करण्यात आले आहे. हरसुल येथील एक आणि चिकलठाण्यातील दोन मशीन महापालिका स्वतः चालविणार आहे. एका मशीनवर पाच ते सहा लेबर लावून काम करण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिली.