शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
5
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
6
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
7
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
8
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
9
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
10
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
11
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
12
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
13
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
14
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
15
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
16
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
17
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
18
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
19
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

निरंजन भाकरेंचं कोरोनानं निधन, आयुष्यभर 'भारूडाचं गारुड' जपलेला लोककलावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 22:49 IST

रहिमाबाद (ता. सिल्लोड) येथील भाकरे यांची जडणघडण वारकरी कुटुंबात झाली. भजन व भारुडाचा वारसा वडीलांकडून मिळाला होता. वडीलांचे छत्र लवकर गेल्यामुळे भाकरे यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.

ठळक मुद्देभारुड लोककलेला त्यांनी सर्वस्व जीवन अर्पण केले होतं. भारुडातून समाजप्रबोधनाचा वसा घेतला. भारुड हेच माझ्या रोजगाराचे साधन आहे. माझ्या कामात माझ्या घरच्यांचा पूर्ण पाठींबा आहे.

औरंगाबाद – प्रसिद्ध लोककलावंत ‘भारुडरत्न’ निरंजन भाकरे (वय ६२) यांचे शुक्रवारी करोनाने निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. भारुडाच्या माध्यमातून आयुष्यभर अवयवदान चळवळीची जनजागृती त्यांनी केली. मात्र, दुर्दैवाने कोरोनामुळे त्यांचे निधन झाले अन् त्याचे स्वत:चे अवयव दानाचे स्वप्न स्वप्नच राहिले. 

रहिमाबाद (ता. सिल्लोड) येथील भाकरे यांची जडणघडण वारकरी कुटुंबात झाली. भजन व भारुडाचा वारसा वडीलांकडून मिळाला होता. वडीलांचे छत्र लवकर गेल्यामुळे भाकरे यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. वडील जुने नाटकर्मी होते. अनेक नाटकात त्यांनी काम केले. त्यामुळे घरातून कलेचा वारसा मिळाला. लहानपणी त्यांनीसुद्धा ग्रामीण भागातील नाटकात छोट्या भूमिका केल्या. कलापथकात हार्मोनिअम वाजविण्याचे काम करायचे. कार्यक्रमानिमित्त ठाणे येथे होते. वर्तमानपत्रात अशोक परांजपे यांच्याविषयी वाचून भारावले. त्यांची भेट घेतली अन आयुष्य बदलले. त्यांनीच लोककलेचा मार्ग दाखविला आणि भारुडाने त्यांना गारुड घातले ते आयुष्यभराठीच.

भारुड लोककलेला त्यांनी सर्वस्व जीवन अर्पण केले होतं. भारुडातून समाजप्रबोधनाचा वसा घेतला. भारुड हेच माझ्या रोजगाराचे साधन आहे. माझ्या कामात माझ्या घरच्यांचा पूर्ण पाठींबा आहे. पत्नीचा माझ्यावर  अन माझा पत्नीवर विश्वास आहे. प्रत्येक संकटात ती माझ्या सोबत असते. संघर्षात तिने मला खंबीर साथ दिली आहे. मुलगा शेखर सावलीसारखा माझ्यासोबत उभा असतो. तो अत्यंत आज्ञाधारक आणि मेहनती आहे, असं ते म्हणायचे. 

भारुड आज सातासमुद्रापार पोहोचले आहे. अमेरिका, मलेशिया, थायलंडमध्ये माझे कार्यक्रम झाले. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझी नोंद झाली. मात्र भारुडाचा प्रवास सोपा नव्हता. घरची परिस्थिती हालाखिची होती. संकटांशी संघर्ष करीत लोककलेची उपासना केली त्याला आज यशाची फळे लागली, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. 

कलाकार तरुणपणी घराबाहेर अन म्हातारपणी घरात असतो. तारुण्यात पैसा, ग्लॅमर, प्रसिद्धी, नाव याच्या मागे बेधुंद धावत असतो. मात्र त्याचवेळी आरोग्याकडे दुर्लक्ष होते. जीवन हे अमूल्य आहे. कधी काय होईल, सांगता येत नाही. त्यामुळे आपले आरोग्य जपा. माणूस सर्व सोंगे घेऊ शकतो. परंतू पैशाचे सोंग घेता येत नाही. त्यामुळे कमावलेला पैसा बचत करुन ठेवा. चंगळवादाच्या नादात पैसा खर्च करु नका. म्हातारपणी तुमचाच पैसा तुमच्या कामी येईल. आज अनेक कलाकार पैसा नसल्यामुळे वैद्यकिय खर्च करु शकत नाही. आपल्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी नवोदितांनी आतापासून याची काळजी घ्यावी. माझे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पुढे परिस्थितीमुळे शिकता आले नाही. कुटूंबियांचे व माझे पोट भरण्यासाठी रोजगार शोधणे आवश्यक होते. खासगी कंपनीत कामे केली. मात्र जम बसला नाही. कुठेच मन रमले नाही. लोककलेची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. आज भारुड हाच माझा श्वास आहे, असं ते म्हणायचे. आज कोरोनाशी त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल