शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात पाऊस

By admin | Updated: September 1, 2014 01:08 IST

लातूर : गणेश आगमनाच्या दिवशी वरुणराजाचे आगमन लातूर शहर व जिल्ह्यात झाले असून नदी, नाले व ओढ्यांना पाणी आले आहे़ गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावला आहे़

लातूर : गणेश आगमनाच्या दिवशी वरुणराजाचे आगमन लातूर शहर व जिल्ह्यात झाले असून नदी, नाले व ओढ्यांना पाणी आले आहे़ गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावला आहे़ शुक्रवारपासून पावसाला प्रारंभ झाला आहे़ गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सूर्यदर्शनही नाही़ लातूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातही वाढ झाली आहे़ पावसाने ताण दिल्यामुळे जिल्ह्यातील सर्व लघु, मध्यम प्रकल्प कोरडे पडलेले आहेत़ आता प्रकल्पात पाणी येत आहे़ देवर्जन, साकोळ, घरणी, रेणा आदी मध्यम प्रकल्पात पाण्याचा स्त्रोत वाढू लागला आहे़ या प्रकल्पांतील पाणी अद्याप जोत्याखाली असले तरी पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे़ शुक्रवारी मध्यरात्रीपासून पाऊस झाल्याने पिकांनीही उभारी घेतली आहे़ या पावसाळ्यातला हा सर्वात मोठा पाऊस असून, शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे़ निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथील तेरणा नदीतही पाणी आले आहे़ कालपासून ही नदी दुतडी वाहू लागली आहे़ मात्र मांजरा नदी अद्याप पूर स्थिती नाही़ परंतु, नदीपात्रात थोडे पाणी वाहू लागले आहे़ रविवारीही पहाटेही जोरदार पाऊस झाला़ सकाळी १० वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र प्रकल्प आणि विहिरी पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज वर्तविली जात आहे़ गेल्या उन्हाळ्यापासून शहर व जिल्ह्यात पाणी टंचाई आहे़ शहरात तर अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा केला जातो़ ग्रामीण भागातही काही भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा आहे़ गेल्या दोन दिवसाच्या पावसामुळे बोर व विंधन विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे आता टँकर कमी होतील असेही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, जळकोट, उदगीर, निलंगा, चाकूर, रेणापूर, अहमदपूर, शिरुर अनंतपाळ, देवणी या दाही तालुक्यात गणेश आगमनाच्या दिवसापासून पाऊस पडत आहे़ यामुळे माना टाकलेली पिके आता डौलू लागली आहेत़ सोयाबीन पिकासह अन्य पिकांना या पावसाने जीवदान मिळाले आहे़ भविष्यकाळातील चारा व पाण्याची टंचाई दुर होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज आहे़ जिल्ह्यात असलेली ८ मध्यम प्रकल्प व लातूर शहराला पाणीपुरवठा करणारी मांजरा प्रकल्प, शिवाय लघु प्रकल्पात अद्याप समाधानकारक साठा नाही़ त्यामुळे मोठ्या पावसाची गरज आहे़