शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नव्याच खुलताबाद - फुलंब्री महामार्गाला पडले तडे, अपघाताचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 7:03 PM

खुलताबाद - फुलंब्री या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू असून या कामाबाबत अनेक तक्रारी असूनही राष्ट्रीय महामार्ग विभाग दखल घेत नाही.

- सुनील घोडके 

खुलताबाद : खुलताबाद - ते फुलंब्री या महामार्गाच्या नवीन रस्त्याच्या कामाला तडे पडत असल्याने रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण झाले नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. आ. प्रशांत बंब यांनी मतदारसंघातील कामात लक्ष घालून सुधारणा करण्याची सूचना राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्याला दोन महिन्यापुर्वीच दिल्या होत्या. परंतु, सुधारणा होण्याऐवजी रस्त्याला तडे पडू लागले आहेत. 

खुलताबाद - फुलंब्री या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू असून या कामाबाबत अनेक तक्रारी असूनही राष्ट्रीय महामार्ग विभाग दखल घेत नाही. खुलताबाद तालुक्यात अंत्यत दर्जाहिन काम झाले असून रस्त्याला सराई, ममनापूर, काटशिवरीफाटा, गदाना येथे  ठिकठिकाणी तडे गेले आहेत.  खुलताबाद तालुक्यातील रस्त्याच्या कामाची वरिष्ठ अधिका-यांनी पाहणी करून काम चांगले करून देण्याची मागणी होत आहे. दैनिक लोकमतने २ फेब्रुवारी रोजीच्या अंकात रस्त्याच्या कामात दुजाभाव या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल आ. प्रशांत बंब व राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंता यांनी जवळपास सहा तास कामाची पाहणी करून चर्चा केली होती. पंरतु, कामात कुठलीच सुधारणा झाली नाही. त्यामुळे आ. प्रशांत बंब यांनी खुलताबाद फुलंब्री या महामार्गाचे काम चांगल्या दर्जाचे करून घ्यावे अशीच काही अपेक्षा खुलताबादकरांनी केली होती. पंरतु, ही आशा आता फोल ठरत आहे. 

फुलंब्री मार्गावर अपघात वाढले खुलताबाद ते फुलंब्री या महामार्गाचे काम जवळपास आटोपले आहेत. हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे. यावरून एक सारखे वाहन चालत नाही. यामुळे अपघात वाढले आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद