नवा गडी, नवा राज !
By Admin | Updated: May 29, 2017 22:45 IST2017-05-29T22:43:27+5:302017-05-29T22:45:39+5:30
बीड : जिल्ह्यातील ६ पोलीस निरीक्षक व २० सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

नवा गडी, नवा राज !
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील ६ पोलीस निरीक्षक व २० सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बीड शिवाजीनगरचे उमेश कस्तुरे परळीतील संभाजीनगर पोलीस ठाण्यात, तर शिवाजीनगरला केजहून नाना लाकाळ यांची बदली करण्यात आली आहे. इतर २४ अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या ठाण्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधीक्षक १९५१ मधील अधिनियमानुसार जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान केलेल्या अधिकारांवरून या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सहा पोलीस निरीक्षकांसह २० ठाणेप्रमुखांच्या बदल्या केल्या आहेत. सोमवारी अधीक्षकांनी त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.