शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

नसे गरीब-श्रीमंत भेद; जगण्यासाठी आधी रुग्णालयात अन् मृत्यूनंतर स्मशानात हवेत पैसे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 13:10 IST

महापालिकेने अंत्यसंस्कारासाठी २ एनजीओंची नियुक्ती केली आहे. एक संस्था मोफत अंत्यसंस्कार करीत आहे.

ठळक मुद्देमहामारीत कुठे माणुसकीचे दर्शन घडते, तर कुठे निव्वळ पैसा कमविण्याचा उद्योग सुरू आहे.

औरंगाबाद : कोरोनात माणसाला जिवंत ठेवायचे असेल, तर खासगी रुग्णालयाच्या काऊंटरवर उपचाराआधी भरघोस रक्कम द्यावी लागते. दुर्दैवाने रुग्ण दगावला, तर स्मशानभूमीतही पैसेच मोजावे लागतात. गरीब-श्रीमंत असे काहीही बघितले जात नाही. फक्त बघितल्या जातात त्या नोटा...!

प्लेग, स्पॅनिश फ्लू अशा अनेक महामाऱ्या यापूर्वी जगभरात पसरलेल्या. प्रत्येक महामारीत लाखो लोक मरण पावले. कोरोना महामारीने सध्या संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. महामारीत कुठे माणुसकीचे दर्शन घडते, तर कुठे निव्वळ पैसा कमविण्याचा उद्योग सुरू आहे. ऐतिहासिक औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात १ लाख १० हजार ४९३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. २ हजार १८० रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या १५ हजार ६३० सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्णालयात बेड, स्मशानभूमीत जागा मिळेनाशहरात व्हेंटिलेटर बेड मिळविणे अशक्यप्राय झाले आहे. कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णालयांमध्ये अथक्‌ परिश्रम घेतल्यानंतर व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन बेड भेटत आहे. रुग्ण दाखल करण्यापूर्वी ५० हजार, तर कुठे १ लाख रुपये ॲडव्हान्सपोटी भरावे लागतातच. त्याशिवाय रुग्णाला प्रवेशच भेटत नाही. रुग्ण कितीही गंभीर असला तरी, खासगी रुग्णालयाला त्याच्याशी काही देणे-घेणे नाही. रुग्ण बरा होऊन घरी गेला, तर किमान दोन ते अडीच लाख रुपये बिल होते आणि मरण पावल्यानंतरही दोन ते तीन लाख रुपये बिल करण्यात येते. बिल भरल्याशिवाय रुग्णालये मृतदेहच देत नाहीत. बिल देऊन मृतदेह घेऊन स्मशानभूमीत नेल्यानंतर, तेथे अंत्यविधीसाठी नातेवाईकांना तासन्‌ तास उभे राहावे लागते.

नावालाच मोफत अंत्यसंस्कार योजनादररोज २५ ते २८ रुग्णांचा मृत्यू होत आहे. प्रत्येक मृतावर शहरातच अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. महापालिकेने अंत्यसंस्कारासाठी २ एनजीओंची नियुक्ती केली आहे. एक संस्था मोफत अंत्यसंस्कार करीत आहे. दुसऱ्या संस्थेला महापालिका एका अंत्यसंस्कारासाठी अडीच हजार रुपये मानधन देते. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी अडीच हजार रुपये महापालिकेकडून वेगळे देण्यात येतात. महापालिकेचे ५ हजार रुपये एका मृतदेहावर खर्च होतात. लाकडे महाग झाली म्हणून स्मशानजोगी प्रत्येक मृतदेहाच्या नातेवाईकांकडून वेगळे पैसे उकळतातच. मोफत असतानाही एक संस्था नातेवाईकांकडून १० ते १५ हजार रुपये उकळते आहे. महापालिका एका मृतदेहासाठी ५ पीपीई कीट मोफत देते. या पीपीई कीटचे पैसेही नातेवाईकांकडून उकळण्यात येतात.

हे घ्या पुरावे...सातारा परिसरातील ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. एन- ६ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिरिक्त लाकूड लागले, म्हणून नातेवाईकांकडून एनजीओ आणि स्मशानजोगीने वेगळी रक्कम वसूल केली. रोशनगेट भागातील ५८ वर्षीय नागरिकावर किलेअर्क येथील कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. एनजीओच्या कार्यकर्त्यांनी कफन, कबर खाेदणारा, पीपीई कीट आदी साहित्याचे कारण दाखवून पैसे घेतले.

कोणतीही तक्रार लेखी स्वरूपात नाहीमहापालिकेकडून कोविड रुग्णांसाठी मोफत अंत्यसंस्कार योजना सुरू करण्यात आलेली आहे. अतिरिक्त पैसे घेतले तर नागरिकांनी तक्रार केल्यास संबंधितांवर त्वरित कारवाई करण्यात येते. मागील काही दिवसांमध्ये अशा प्रकारची कोणतीही तक्रार लेखी स्वरूपात प्राप्त झालेली नाही.- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका