हिरवाईने नटला नीळकंठेश्वराचा परिसर
By Admin | Updated: August 4, 2014 00:51 IST2014-08-04T00:27:04+5:302014-08-04T00:51:11+5:30
अमोल राऊत, तळणी मंठा तालुक्यातील श्रीक्षेत्र नीळकंठेश्वर संस्थान (पिंपरखेडा) येथे पुरातन काळातील शिव मंदिर आहे. हे मंदिर निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे
हिरवाईने नटला नीळकंठेश्वराचा परिसर
अमोल राऊत, तळणी
मंठा तालुक्यातील श्रीक्षेत्र नीळकंठेश्वर संस्थान (पिंपरखेडा) येथे पुरातन काळातील शिव मंदिर आहे. हे मंदिर निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. पावसामुळे परिसर हिरवागार बनला आहे. श्रावण मास निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदू धर्मात श्रावण महिन्यास अनन्यसाधारण महत्व आहे. शिव मंदिरात श्रावण सोमवारी भाविक महादेवाची पूजा करतात. बेलाचे १०८ पान अर्पण करतात. श्री नीळकंठेश्वर संस्थान हे निसर्गाच्या सानिध्यात असलेले पुरातन काळातील आहे. मंदिराचा जीर्णोद्धार महामंडळेश्वर श्री. १००८ स्वामी कृष्णचैतन्य पुरी महाराज यांनी के ला आहे.
तालुक्यासह महाराष्ट्रातील शिवभक्त दर्शनासाठी येतात. शिव मंदिराच्या पायऱ्यालगत नदी आहे. ती खळखळून वाहते. एक गोमूख आहे. त्यातून स्वच्छ पाणी नियमित वाहत असल्याने दर्शनाला येणाऱ्या भाविकांची पाण्याची तहान येथे भागते. येथील गोशाळेत २० गायी आहेत. श्रावण महिन्यामध्ये अनेक भाविक मोफ त अन्नदान (भंडारे) करतात. या मंदिरात ऋ षीपंचमीला महाराष्ट्रासह, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार यासह विविध राज्यातून २०० पेक्षा अधिक साधू- संत हे परिक्रमेसाठी येतात.
श्रावणी सोमवारी येथे विशेष धार्मिक कार्यक्रम पार पडतात. दर्शनासाठी जिल्ह्यासह विदर्भातूनही भाविक येतात. अनेक शिवभक्त स्वखर्चाने भंडऱ्यांचे आयोजन करतात. दरवर्षी ‘‘महिमा नीळकंठेश्वराचा’’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम पार पडतो. धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी कृष्णचैतन्य पुरी यांनी केले.