शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नाले भूमिगत करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:29 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीबाहेरील परिसरात वाहणारे नाले भूमिगत करण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीबाहेरील परिसरात वाहणारे नाले भूमिगत करण्याची गरज आहे. यामुळे विमानतळाच्या हद्दीत वावरणारे पक्षी, मोकाट कुत्रे आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येतील. यासाठी महापालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.विमानतळाच्या हद्दीतून तीन नाले वाहत आहेत. जयभवानीनगर, म्हाडा कॉलनी आदी भागांतून वाहणारे नाले थेट विमानतळाच्या संरक्षक भिंतीखालून वाहत धावपट्टीखालून जातात. बाराही महिने वाहणाºया या नाल्यांमुळे परिसरात पक्ष्यांचा मुक्त संचार दिसतो. नाल्यातून प्लास्टिकच्या पिशव्या, मेलेली जनावरे असा कचरा संरक्षक भिंतीजवळच जमा होतो. त्यामुळे नाल्यातील कचºयातून मिळणाºया खाद्यपदार्थांमुळे पक्ष्यांबरोबर मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार होत आहे. यातून अनेकदा विमानांच्या उड्डाणात अडथळा निर्माण होण्याच्या घटना होतात.ही परिस्थिती लक्षात घेऊन विमानतळ प्राधिक रणाने विमानतळाच्या हद्दीतील नाले भूमिगत करण्यासाठी पुढाकार घेतला. निविदा प्रक्रियेनंतर एप्रिल महिन्यात नाले भूमिगत करण्याचे काम सुरू झाले. पावसामुळे कामात अडचणी येत आहेत; परंतु लवकरच विमानतळाच्या हद्दीतील नाले भूमिगत होतील; परंतु केवळ विमानतळाच्या हद्दीतील नाले भूमिगत करून हा प्रश्न सुटणार नाही. संरक्षक भिंतीखालून येणाºया नाल्यांमध्ये प्राधिक रणातर्फे लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. या जाळ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. त्यातून पक्षी, मोकाट कुत्र्यांना आयते खाद्यपदार्थ मिळत आहेत, त्यामुळे विमानतळाच्या हद्दीबाहेर वाहणारे नालेही भूमिगत होण्याची गरज आहे, तरच हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.नाल्यांमुळे निर्माण होणाºया अडचणींविषयी विमानतळ प्राधिक रणाने मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना माहिती दिली. त्यामुळे १७ सप्टेंबर रोजी मनपा आयुक्तांनी नाल्यांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे उपस्थित होते. मनपा आयुक्तांनी पाहणी केल्यामुळे नाल्यांचा प्रश्न निकाली निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.