शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

शहरातून मुंबईसाठी नव्या विमानसेवेची गरज स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 7:05 PM

पहिल्याच दिवशी १३० प्रवासी रवाना

ठळक मुद्दे सात दिवसांसाठी विमान

औरंगाबाद : हज यात्रेकरूंच्या परतीच्या प्रवासाच्या निमित्ताने एअर इंडियाकडून ७ दिवसांसाठी चालविण्यात येणाऱ्या औरंगाबाद-मुंबई विमानाला रविवारी (दि. १) पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या विमानाने १३० प्रवासी मुंबईला गेले. त्यामुळे शहरातून मुंबईसाठी नव्या विमानाची किती गरज आहे, हे समोर आले आहे.

हज यात्रेनिमित्त एअर इंडियाकडून ७ दिवसांसाठी दिल्ली-औरंगाबाद विमानसेवा चालविण्यात आली होती. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता यात्रेकरूंच्या परतीच्या प्रवासामुळे १ सप्टेंबरपासून ७ दिवसांसाठी एअर इंडियाकडून औरंगाबाद- मुंबई विमानसेवा चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. १ सप्टेंबरनंतर आता ४ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३०, ५ सप्टेंबर रोजी पहाटे २.०५ वा., ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.४५ वा., ७ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३५ वा., ८ व ९ सप्टेंबर रोजी सकाळी ५.३५ वाजता हे विमान राहील. 

या विमानसेवेच्या पहिल्याच दिवशी रविवारी १३० प्रवासी मुंबईला गेले. दुसऱ्या उड्डाणासाठी म्हणजे ४ सप्टेंबरला ७७ प्रवाशांची बुकिंग झालेली आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जेट एअरवेजच्या विमानसेवेमुळे औरंगाबादला सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत मुंबईची हवाई कनेक्टिव्हिटी होती. आता मुंबईसाठी एकमेव एअर इंडियाच्या विमानाचा आधार आहे. तेदेखील सायंकाळी. एकाच विमानामुळे अधिकच्या तिकिटदरालाही प्रवाशांना सामोरे जावे लागते. एअर इंडियाकडून १६ आॅक्टोबरपासून मुंबई - औरंगाबाद -उदयपूर अशी आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा चालविण्यात येणार आहे. यामुळे उदयपूरसह मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. या विमानसेवेबरोबर मुंबईसाठी दररोज आणखी विमानसेवेची गरज असल्याचे सात दिवसांच्या विमानसेवेवरून स्पष्ट होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

‘इंडिगो’कडे लक्षइंडिगोने औरंगाबादहून विमानसेवा सुरूकरण्याची तयारी केली आहे. ‘इंडिगो’च्या कार्यालयासाठी प्राधिकरणाने जागा दिली असून, तेथे कार्यालय उभारणीचे काम सुरू आहे. या कंपनीकडून नेमकी कोणत्या शहरासाठी विमानसेवा सुरूकेली जाते, याकडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :airplaneविमानAurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळpassengerप्रवासी