सैन्यात महाराष्ट्राचा डंका! छ. संभाजीनगरच्या SPI संस्थेचे २१ विद्यार्थी 'एनडीए'त झळकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 19:44 IST2026-04-13T19:42:39+5:302026-04-13T19:44:05+5:30

पहिल्या १०० मध्ये 'मराठमोळे' ६ चेहरे! एनडीए परीक्षेत महाराष्ट्राच्या लेकरांची उत्तुंग झेप.

NDA Final Result 2025: 21 Cadets from SPI Chhatrapati Sambhajinagar Selected for Defence Services. | सैन्यात महाराष्ट्राचा डंका! छ. संभाजीनगरच्या SPI संस्थेचे २१ विद्यार्थी 'एनडीए'त झळकले

सैन्यात महाराष्ट्राचा डंका! छ. संभाजीनगरच्या SPI संस्थेचे २१ विद्यार्थी 'एनडीए'त झळकले

छत्रपती संभाजीनगर : भारतीय सैन्यदलात अधिकारी घडवणाऱ्या 'नॅशनल डिफेन्स अकॅडमी' आणि 'नेव्हल अकॅडमी' परीक्षेच्या निकालात छत्रपती संभाजीनगरच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेने पुन्हा एकदा आपली यशाची परंपरा अधोरेखित केली आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या एनडीए (द्वितीय) २०२५ च्या अंतिम निकालात या संस्थेतील तब्बल २१ विद्यार्थ्यांनी 'टॉप मेरिट'मध्ये स्थान मिळवले. विशेष म्हणजे, मुलींच्या सैन्य भरतीतही महाराष्ट्राच्या कन्येने उत्तुंग भरारी घेतली असून जिया करपेने देशात दुसरा क्रमांक पटकावला.

एनडीएच्या १५६ व्या आणि नेव्हल अकॅडमीच्या ११८ व्या तुकडीसाठी सप्टेंबर २०२५ मध्ये लेखी परीक्षा झाली होती. त्यानंतर झालेल्या अत्यंत खडतर अशा एसएसबी मुलाखतींमधून एसपीआयच्या २१ कॅडेट्सची अंतिम निवड झाली. या यशाचे वैशिष्ट्य म्हणजे, निवड झालेल्या २१ पैकी ६ विद्यार्थी हे देशातील पहिल्या १०० रँकिंगमध्ये झळकले आहेत. हे सर्व यशस्वी विद्यार्थी आता पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू होतील.

'जीएसपीआय'ची ऐतिहासिक झेप
मुलींना सैन्यदलात संधी मिळावी यासाठी नाशिक येथे २०२२ मध्ये सुरू झालेल्या 'मुलींच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेने' अवघ्या तीन वर्षांत आपला राष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण केला आहे. मूळची सातारा येथील असलेल्या जिया करपे हिने या परीक्षेत 'ऑल इंडिया रँक ०२' प्राप्त करत इतिहास रचला. सातारा येथीलच समृद्धी इंगळे हिने १५ वी 'ऑल इंडिया रँक' मिळवून आपले स्थान निश्चित केले. या दोन्ही विद्यार्थिनींची नेव्हल अकॅडमीत प्रशिक्षणासाठी निवड झाली.

खडतर प्रशिक्षण आणि जिद्द
संभाजीनगरची 'एसपीआय' संस्था ही राज्य शासनाच्या वतीने चालवली जाते. या संस्थेच्या देखरेखीतच नाशिकच्या 'जीएसपीआय'चे कामकाज चालते. यूपीएससी लेखी परीक्षा आणि त्यानंतरची व्यक्तिमत्त्व चाचणी यासाठी येथे दर्जेदार प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांची जिद्द आणि मेहनत यामुळेच महाराष्ट्राचे विद्यार्थी संरक्षण दलात अधिकारी म्हणून रुजू होत आहेत.

Web Title : सेना में महाराष्ट्र का दबदबा! SPI के 21 छात्र NDA में सफल।

Web Summary : छत्रपति संभाजीनगर के SPI संस्थान ने फिर सफलता पाई। NDA परीक्षा में 21 छात्रों ने शीर्ष स्थान प्राप्त किया, जिनमें से छह शीर्ष 100 में हैं। जिया करपे लड़कियों में शीर्ष पर रहीं, राष्ट्रीय स्तर पर दूसरा स्थान प्राप्त किया। ये छात्र खडकवासला में प्रशिक्षण लेंगे।

Web Title : Maharashtra's SPI shines! 21 students crack NDA exam.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar's SPI continues its success streak. 21 students secured top ranks in the NDA exam, with six in the top 100. Gia Karpe topped among girls, securing the second rank nationally. These students will train at Khadakwasla.