शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पानगळ गळली आता नवी पालवी फुटत आहे; डॉ. अमोल कोल्हे यांची पक्ष सोडणाऱ्यांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 07:38 IST

सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होत आहे.

औरंगाबाद - इतिहासाची पुनरावृत्ती होतात असे म्हणतात. ८४ साली शरद पवारांना आजच्या सारखेच लोक सोडून जात होते मात्र गेले त्यापेक्षा दुप्पट आमदार पवारसाहेबांनी निवडून आणले. पानगळ गळली की नव्याने पालवी फुटते तशीच पानगळ जावून नवी पालवी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून फुटली आहे असे मत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गंगापूर येथील जाहीर सभेत मांडले. 

यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, काल शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आणि सरकारने या यात्रेचा धसका घेतला. आपली यात्रा सुरू झाल्या झाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली महाजनादेश यात्रा संपुष्टात आणली. गंगापूरचे स्थानिक आमदारांनी असे भाष्य केले की आश्वासन फक्त द्यायचे असते पूर्ण करायचे नसते. या वाक्याचा हिशोब येत्या विधानसभा निवडणुकीत करा. भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे तेव्हा येत्या काळात बदल घडवून शिवस्वराज्य स्थापन करण्यास सिंहाचा वाटा द्या असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

तसेच शिवस्वराज्य यात्रेला सुरुवातीला ट्रोल करण्यात आले. राष्ट्रवादीचे इतर नेते कुठे आहेत अशी विचारणा केली गेली. जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड पुरपरिस्थिती असल्याने जनतेची मदत करत आहेत. धनंजय मुंडे परळीतील नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नावर भांडत आहेत. राष्ट्रवादीचे नेतृत्व जनतेसाठी काम करत आहेत असेही अमोल कोल्हे म्हणाले. 

दरम्यान सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होत आहे. सरकारमार्फत दोन समाजात भांडणे लावण्याचे काम केले जात आहे. भांडणं लावून राजकारण करायचे हेच तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांची रणनीती असल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी करत येत्या विधानसभा निवडणुकीत आघाडीचा मुख्यमंत्री असला पाहिजे असं आवाहन जनतेला केले.

शेतकर्‍यांची जाणीव नसलेले सरकार - अजित पवारशेतकऱ्यांची जाणीव नसलेले सरकार आल्यावर काय घडतं हे गेले पाच वर्ष राज्यातील जनता अनुभवत आहे सरकार जनतेकडे लक्ष न दिल्यामुळेच राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढली. तरुणांच्या हाताला काम नाही. बेकारीशी झुंज देत आहेत. मेगाभरतीबाबत काय झाले याचा जबाब सरकारने द्यायला हवा. द्यायचे नाही तर लोकांची दिशाभूल का करता असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला. तसेच आंदोलन करण्याचा अधिकार भारतीय घटनेने आपल्याला दिला आहे परंतु सध्याचे सरकार दडपशाही करुन आंदोलन करणार्‍याला अटक करून तुरुंगात टाकत आहे. हे काय सुरु आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019