नायगावला लाखाचे बक्षीस
By Admin | Updated: May 5, 2016 00:36 IST2016-05-05T00:31:15+5:302016-05-05T00:36:38+5:30
उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीला यशवंतराव चव्हाण आदर्श ग्रामसभा पुरस्कार मिळाला आहे. शासनाने सदरील ग्रामपंचायतीस एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.

नायगावला लाखाचे बक्षीस
आदर्श ग्रामसभा : प्रशस्तीपत्रकही देणार
उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीला यशवंतराव चव्हाण आदर्श ग्रामसभा पुरस्कार मिळाला आहे. शासनाने सदरील ग्रामपंचायतीस एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.
ग्रामसभेत मोठ्या प्रमाणात जनजागृती करून ग्रामपंचायतीच्या हद्दीत उत्कृष्ट ग्रामसभेचे आयोजन, ग्रामस्थांची उपस्थिती, सभेतील घेतलेले विषय आदी निकषांच्या आधारे मुल्यमापन करण्यात येते. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेले प्रस्ताव शासनाकडे सादर केले जातात. या प्रस्तावांचा विचार करून शासनाने प्रात्र ग्रामपंचायतींना यशवंतराव चव्हाण आदर्श ग्रामसभा पुरस्कार दिला आहे. यामध्ये कळंब तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीला स्थान मिळाले आहे. अशा पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींसाठी प्रत्येकी एक लाख रूपये एवढे बक्षीस देण्यात येणार आहे. सदरील पुरस्काराचे वितरण मे २०१६ अखेर करण्यात यावे, असे स्पष्ट आदेश शासनाकडून निर्गमित करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)