तुळजाभवानी मंदिरात नवचंडी यज्ञ

By Admin | Updated: October 3, 2014 00:32 IST2014-10-03T00:27:47+5:302014-10-03T00:32:39+5:30

तुळजापूर : शारदीय नवरात्रोत्सवात गुरूवारी दुर्गाष्टमीनिमित्त श्री तुळजाभवानी मातेची महिषासूर मर्दिनी अलंकार विशेष महापूजा मांडण्यात आली होती.

Navchandi Yagna in Tulajabhavani temple | तुळजाभवानी मंदिरात नवचंडी यज्ञ

तुळजाभवानी मंदिरात नवचंडी यज्ञ


तुळजापूर : शारदीय नवरात्रोत्सवात गुरूवारी दुर्गाष्टमीनिमित्त श्री तुळजाभवानी मातेची महिषासूर मर्दिनी अलंकार विशेष महापूजा मांडण्यात आली होती. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दरम्यान, सकाळी सहा वाजता नित्योपचार अभिषेक पुजेस प्रारंभ झाा. त्याच वेळी सात वाजता होमकुंडावर नवचंडीच्या यज्ञासही सुरूवात झाली.
या यज्ञासाठी व नवग्रहाचे पूजन करण्यासाठी यजमान म्हणून धार्मिक विधीसाठी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे हे सपत्नीक उपस्थित होते. पाच तासाच्या पुजेनंतर दुपारी सव्वाबारा वाजता होमावरील पुर्णाहुती सोहळा पार पडला. या होमहवनाचे पौरोहित्य सरकारी उपाध्ये बंडोपंत पाठक, नागेश अंबुलगे, श्रीराम अपसिंगेकर, राजू प्रयाग, अनंत कांबळे यांच्यासह विनीत कोंडो, मकरंद प्रयाग आदींनी केले. यानंतर श्री तुळजाभवानी मातेची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. यात तुळजाभवानीने सहदेवतांची शक्ती घेऊन आक्रमक रूप धारण करून महिषासुराचा त्रिशुळाने वध केल्याची ही पूजा होती. या पुजेचे दर्शन घेून भाविक ‘आई राजा उदो उदो, सदानंदिचा उदो उदोऽऽऽ’ असा जयघोष करीत मंदिरातून बाहेर पडत होते.
यावेळी महंत तुकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा, भोपे पुजारी, पाळीकर पुजारी, उपाध्ये, सेवेकरी, आराधी, व्यवस्थापक तहसीलदार सुजीत नरहरे, सहाय्यक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, मंदिर सुरक्षा प्रमुख, पोलिस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुर्गाष्टमीनिमित्त शहरवासिय व पुजाऱ्यांनी आपापल्या घरी आठ कुमारीकेचे पान-सुपारी, फळ, दक्षिणा व दूध देऊन पूजन केले. शुक्रवारी होमकुंडावर खंडेनवमीनिमित्त दुपारी बारा वाजता धार्मिक विधी होऊन घटोत्थापन होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Navchandi Yagna in Tulajabhavani temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.