नवरात्रोत्सवातील कार्यक्रमांना निर्बंध नाही; प्रचाराला बंदी
By Admin | Updated: September 28, 2014 00:10 IST2014-09-28T00:05:36+5:302014-09-28T00:10:08+5:30
नांदेड: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीतच सुरू असलेल्या नवरात्रोत्सवातील कार्यक्रम तसेच त्यामधील आरतीसारख्या विधीवर बंदी घातली नसल्याचे आयोगाकडून कळवण्यात आले आहे़

नवरात्रोत्सवातील कार्यक्रमांना निर्बंध नाही; प्रचाराला बंदी
नांदेड: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीतच सुरू असलेल्या नवरात्रोत्सवातील कार्यक्रम तसेच त्यामधील आरतीसारख्या विधीवर बंदी घातली नसल्याचे आयोगाकडून कळवण्यात आले आहे़ परंतु या नवरात्रोत्सवात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आली आहेत, असे जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळवले आहे़
भारत निवडणूक आयोगाच्या या मार्गदर्शक तत्वानुसार, नवरात्रोत्सव साजरा करण्यावर, त्यातील आरती आदी विधींवर बंदी नाही़ त्यामध्ये राजकीय तसेच नेतेमंडळी, संभाव्य उमेवार यांना सहभागी होण्यावर निर्बंध नाहीत़ पण अशा कार्यक्रमांचा राजकीय प्रचार, निवडणुकीतील प्रचाराचा मंच म्हणून वापर करता येणार नाही़ तसा वापर झाल्यास, त्याबाबत धार्मिक संस्था, गैरवापरास प्रतिबंध कायदा १९९८ तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन समजण्यात येईल़
या उत्सवांच्या उद्घाटन तसेच समारोप समारंभात मात्र अशा राजकीय व्यक्तींचा विशेष निमंत्रित किंवा प्रमुख पाहुणे म्हणून समावेश करता येणार नाही़ (प्रतिनिधी)