शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

निसर्गाचा खेळ! ऑगस्ट महिना लागला, मराठवाड्यात पाऊस ४९ टक्क्यांवर थांबला

By विकास राऊत | Updated: August 2, 2023 13:43 IST

जून व जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस झालाच नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पीक पेरण्यांचा पहिला टप्पा संपुष्टात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस आजवर बरसला असून, मराठवाड्यात ४९ टक्क्यांवर पाऊस थांबला आहेे. ६१ दिवसांत फक्त ४९ टक्के पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाला असला तरी नाशिक, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यात पावसाने दडी मारली आहे.

जून व जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस झालाच नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पीक पेरण्यांचा पहिला टप्पा संपुष्टात आला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील पावसाळ्यात ६७९.५ मिमी सरासरी पावसाचे प्रमाण असून, मागील ६१ दिवसांमध्ये ३३२.९ मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी ४९० मि.मी. पाऊस झाला होता. ३४० मि.मी. पाऊस या दोन महिन्यांत अपेक्षित होता. पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्यांवर व मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पांतील जलसाठ्यांवर परिणाम झाला आहे. ११ मोठ्या प्रकल्पांसह मध्यम १०७ व लघू ७४९ प्रकल्पांमध्ये कमी जलसाठा आहे. दरम्यान, अवर्षणप्रवण भागातील शेतकऱ्यांना एकरी १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जायकवाडीत ३२ टक्के पाणीमराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी प्रकल्पात ३२ टक्के जलसाठा आहे. प्रकल्पात सध्या ४ हजार २५६ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. १ जूनपासून १७६ दलघमी पाणी प्रकल्पात आले आहे. १.०४१ दलघमी पाण्याचा विसर्ग काळात झाला आहे.

जिल्हा.......झालेला पाऊसछत्रपती संभाजीनगर....२४१ मि.मी.जालना....२५१ मि.मी.बीड.......२४० मि.मी.लातूर ....३१३ मि.मी.धाराशिव....२६५ मि.मी.नांदेड.....५७६ मि.मी.परभणी...२७३मि.मी.हिंगोली...४२९ मि.मी.एकूण....३३२ मि.मी.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी