शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

रुमाल टाकून पकडलेली जागा

By admin | Updated: July 30, 2014 01:18 IST

औरंगाबाद : पदवीधर पदोन्नतीची प्रक्रिया प्रशासनाने पारदर्शी पार पाडल्याची जाहिरात करणाऱ्या शिक्षक संघटनांच्या नेत्यांनीच स्वत:सह पत्नीसाठी सोयीस्कर जागा पदरात पाडून घेतल्या आहेत.

औरंगाबाद : पदवीधर पदोन्नतीची प्रक्रिया प्रशासनाने पारदर्शी पार पाडल्याची जाहिरात करणाऱ्या शिक्षक संघटनांच्या नेत्यांनीच स्वत:सह पत्नीसाठी सोयीस्कर जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. ही पदवीधर पदोन्नतीची प्रक्रिया तर चक्क बसमध्ये रुमाल टाकून पकडलेल्या जागेची आठवण करून देत असल्याची टीका महिला शिक्षिकांनी केली आहे. शिक्षक संघटनांच्या विशिष्ट भूमिकेमुळे जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या, पदोन्नत्या कायम चर्चेचा व वादाचा विषय ठरत आहेत. ग्रामविकास खात्याच्या आदेशाने जिल्हा परिषदेत शिक्षक पदवीधर पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया पारदर्शी झाल्याची जाहिरात शिक्षक संघटनांतर्फे केली जात होती; परंतु या जाहिरातबाजीमागे लपलेले काळे सत्य जिल्हा परिषदेतील शिक्षिकांनी लिहिलेल्या अनावृत पत्राने उघड केले आहे. लोकमत प्रतिनिधीने यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, ‘रुमाल टाकून’ पकडलेल्या अनेक जागांचा खुलासा झाला. पदोन्नतीची ही प्रक्रिया एलसीडीवर रिक्त जागा दाखवून शिक्षकांचे समुपदेशन करून राबविली गेली. शिक्षकांनी पदोन्नती व पदस्थापनेची जागा स्वखुशीने स्वीकारलेली असते. त्यामुळे त्यांच्या पदस्थापनेच्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, ‘सदर जागा बदलून देता येणार नाही, अगर नाकारता येणार नाही.’ तरीही अधिकाऱ्यांनी शिक्षक संघटनांच्या नेत्यांशी संगनमत करून अनेक जागा नाकारल्या किंवा परस्पर बदलून दिल्या. अशी झाली फसवणूकमुख्य रस्त्यावरील शाळेत नेमणुकीवर असलेल्या आणि पदोन्नतीच्या यादीत ज्येष्ठ असलेल्या काही शिक्षकांनी ही बनवाबनवी केली. त्यांना रिक्त जागांचा मोठा पर्याय होता. त्यांनी चांगल्या जागावर प्रारंभी नियुक्ती घेत ती जागा अडकवून टाकली. आपली पत्नी किंवा स्नेह्याचा क्रमांक येताच प्रारंभी नियुक्ती घेतलेली व्यक्ती प्रक्रिया स्थळी येऊन जागा स्वीकारण्यास नकार देत होती. मग सदर रिक्त जागेवर त्यांची पत्नी, पती किंवा स्नेह्याला नियुक्ती दिली जात होती.नकार देता येत नसताना अधिकाऱ्यांनी त्या नियुक्त्या रद्द कशा केल्या, सहमतीने व स्वखुशीने स्वीकारलेल्या नियुक्त्या रद्द करण्यासाठी सदर व्यक्ती चालू प्रक्रियेत कशी येत होती, तिला आत कसे येऊ दिले जात होते. कारण इतर शिक्षकांना ही प्रक्रिया सुरू असताना सभागृहात प्रवेश दिला जात नव्हता. मग संबंधितांना सभागृहात प्रवेश मिळवून देण्यासाठी कोणती यंत्रणा कार्यान्वित होती, आदी प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रारंभी, नियुक्त्या स्वीकारून नंतर त्या रद्द करण्याचे किमान २५ ते ३० प्रकार घडले असून, त्या जागा शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, त्यांच्या पत्नी व स्वकीयांनी पटकावल्या आहेत. गोलवाडी, छावणी, अंजनडोह, पिसादेवी, शेंद्रा कमंगर, खामखेडा, काद्राबाद या शाळांतील जागांवरून जिल्हा परिषदेत चांगलाच खो-खोचा खेळ रंगला होता. हमरस्त्यावरील शेंद्रा कमंगर शाळेतील एका शिक्षिकेने काद्राबाद येथील शाळेतील नियुक्ती स्वीकारून जागा अडकवली. अंजनडोहच्या जागेवर रुमाल टाकून ती जागा धरून ठेवणाऱ्या शिक्षकाने अंजनडोहला मित्राला दिले. मग त्या शिक्षिकेचा काद्राबादला नकार आला व तेथे अंजनडोह मित्राला देणारे शिक्षक स्थानापन्न झाले. हा खेळ शिक्षणाधिकाऱ्यांना समजला नाही की, त्यांची त्याला मूकसंमती होती, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. शिक्षिकांचे अनावृत पत्र शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांच्या कर्तव्यनिष्ठ भूमिकेचा ‘चांगलाच’ आदर करून या शिक्षिका लिहितात, आपण अतिरिक्त ठरलेल्या ७५ मुख्याध्यापकांना सुरुवातीलाच माघार घ्यायला लावून आणि सर्वांत शेवटी खास माणसांना पुन्हा त्याच पदावर सुरक्षित पोहोचवून ‘आपला माणूस-आपला बाणा’ दाखवून दिलात. आरटीई अ‍ॅक्टनुसार घरी जाणारे मुख्याध्यापक आपल्या संपर्कात येताच त्यांना संरक्षण देण्यासाठी महिला मुख्याध्यापकांना घाबरवून त्यांना स्वेच्छेने मुख्याध्यापक पदावरून माघार घेत पदवीधर व्हायला लावले आणि ‘भेटलेल्या’ मुख्याध्यापकांना सेफ झोनमध्ये आणले. बी.एसस्सी. शिक्षकांनी पदोन्नती स्वीकारू नये, म्हणून बातम्या पेरल्या व नंतर त्याच जागेवर बी.ए. पदवीधारक आरामशीर पोहोचले, व्वा...