शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडकरांना अल्प दरात मिळणार धान्य

By admin | Updated: May 23, 2014 01:11 IST

नांदेड: जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने धान्य महोत्सवाचे आयोजन नांदेड शहरात करण्यात येणार असल्याने नांदेडकरांना अल्प दरात धान्य उपलब्ध होणार आहे़

नांदेड: जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने धान्य महोत्सवाचे आयोजन नांदेड शहरात करण्यात येणार असल्याने नांदेडकरांना अल्प दरात धान्य उपलब्ध होणार आहे़ हा धान्य महोत्सव २५ ते २६ मे या कालावधीत नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आयोजित केला आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी दिली आहे़ शेतकर्‍याच्या मालाला योग्य भाव मिळावा व ग्राहकास योग्य दराने व चांगल्या दर्जाचे शेतमाल मिळावा, या उद्देशाने हा महोत्सव घेतला जातो़ शेतकरी व ग्राहक यांच्या मधील मध्यस्थ वगळून त्यांना एकत्रित आणणे, शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची वजावट न करता शेतमालाची रक्कम तातडीने व योग्य मिळावी या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने या धान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे़ सदरील महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या हस्ते होणार आहे़ मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, मनपा आयुक्त जी़ श्रीकांत, जिल्हा पोलिस अधिक्षक परमजितसिंग दहिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़ या धान्य महोत्सवात जिल्ह्यातून गहू, ज्वारी, सर्व दाळी व इतर शेतमाल शेतकरी स्वत: विक्रीसाठी आणणार आहेत़ शहरातील सर्व नागरिकांनी चांगल्या दर्जाचा माल खरेदी करावा व धान्य महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नांदेड व प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी केले आहे़ कृषी विभाग व प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने हा धान्य महोत्सव घेण्यात येत आहे़ गतवर्षीच्या धान्य महोत्सवात ४ हजार ९४९ क्विंटलची विक्री होऊन १ कोटी २५ लाखांची उलाढाल झाली होती. बाजारापेक्षा महोत्सवात शेतमालाला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात. गतवर्षी ८० शेतकरी सहभागी होते. (प्रतिनिधी)