शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 18:07 IST

Nanded Loksabha By election : इम्तियाज जलील यांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

Nanded Loksabha By election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विधानसभेसोबतच निवडणूक आयोगाने नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. काँग्रेसने या जागेवर वसंतराव यांचे पुत्र रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, त्यांच्यासमोर आता एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दंड ठोपटले आहेत.

इम्तियाज जलील यांनी नांदेड लोकसभा (Nanded Loksabha election) पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. या पोटनिवडणुकीसोबतच ते छत्रपती संभाजीनगरमधून विधानसभा निवडणूकदेखील लढवणार आहेत. लोकमतशी बोलताना इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली. जलील म्हणाले की, 'नांदेडमधून लोकसभा लढण्याची संधी आलेली आहे. संधी असताना का प्रयत्न करायचे नाही? लोकांमध्ये रोष पाहायला मिळतोय. मी महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम खासदार होतो, मला पाडण्यासाठी या लोकांनी कशी मेहनत घेतली, हे सर्वांना माहिती आहे. मी ही लोकसभा पोटनिवडणूक लढवावी, अशी आमच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्यांनी ती इच्छा आमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांना बोलून दाखवली आहे.'

'शिवाय माझीही निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. एमआयएम महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वात जास्त प्रतिसाद नांदेडमधून मिळाला होता. आम्हाला संधी आल्यानंतर आम्ही दिवंगत खासदाराबाबत का विचार करू? आम्ही आमच्या पक्षाच विचार करणार आहोत. पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर निर्णय सोडला आहे. चाचपणी करा आणि लढवा, असे आम्हाला पक्षाने सांगितले आहे. आमचे नेते ओवेसी जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. मी कुठून लढणार हे ओवेसीसाहेब ठरवणार आहेत. काही जागांवर ओवेसी जातीने लक्ष घालत आहेत,' अशी माहिती जलील यांनी यावेळी दिली. 

काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसोबतच 20 नोव्हेंबर रोजी नांदेड लोकसभेच्या जागेसाठी मतदान होणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून अद्याप या जागेसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNandedनांदेडmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेस