शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबर अखेरपर्यंत नांदेड-औरंगाबाद एक्स्प्रेस

By admin | Updated: December 15, 2014 00:50 IST

औरंगाबाद : रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या औरंगाबाद-रेनीगुंटा-औरंगाबाद एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर आता नांदेड-औरंगाबाद साप्ताहिक एक्स्प्रेस डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होणार आहे

औरंगाबाद : रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या औरंगाबाद-रेनीगुंटा-औरंगाबाद एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर आता नांदेड-औरंगाबाद साप्ताहिक एक्स्प्रेस डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होणार आहे, तर औरंगाबादकरांच्या अनेक वर्षांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून अकोलामार्गे जाहीर केलेल्या नांदेड-बिकानेर रेल्वेला रेल्वे बोर्डाकडून अद्यापपर्यंत मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे मंजुरी मिळाल्यानंतरच ही गाडी धावणार आहे.रेनीगुंटा एक्स्प्रेसच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमप्रसंगी दक्षिण मध्य रेल्वेचे एडीआरएम पी. बी. निनावे यांनी ही माहिती दिली. याशिवाय त्यांनी रेल्वेच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात माहिती दिली. परभणी-मुदखेड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण मंजूर असतानाही केवळ निधीअभावी रखडले आहे, तर ‘आयटीडीसी’च्या सहकार्याने मॉडेल रेल्वेस्थानकाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम केले जाणार आहे. यासाठी रेल्वेचा निधीही उपलब्ध आहे; परंतु ‘आयटीडीसी’कडून अद्यापही यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कामही रखडले आहे. रेल्वेस्थानकातील सरकत्या जिन्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे.नांदेड विभागास ६४ गाड्यांच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी १ लाख २० हजार प्रवाशांची वाहतूक करण्याचे टार्गेट आहे; परंतु विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने प्रत्यक्षात हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे हेच कारण पुढे करून अनेक प्रस्ताव नाकारले जात असल्याचे त्यांनी सांगितले. नांदेड-मनमाड पॅसेंजरला लागलेल्या आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर प्रवासी ज्वलनशील पदार्थ बाळगतात हे वेळोवेळी केलेल्या तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे आग लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवाय आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पुन्हा पहिल्यापासून या घटनेची तपासणी करण्याची तयारी रेल्वेने केली आहे.