शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

आश्रम वसतिगृहात विद्यार्थ्याचा गूढ मृत्यू

By admin | Updated: January 20, 2015 01:25 IST

औरंगाबाद : सातारा परिसरातील ओंकार बालक आश्रमाच्या वसतिगृहामध्ये एका १५ वर्षीय विद्यार्थ्याचे गूढरीत्या निधन झाल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली.

औरंगाबाद : सातारा परिसरातील ओंकार बालक आश्रमाच्या वसतिगृहामध्ये एका १५ वर्षीय विद्यार्थ्याचे गूढरीत्या निधन झाल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली. सातारा पोलीस ठाण्याचे जमादार शेख हनिफ यांनी सांगितले की, सरकारी अनुदानावर सुरू असलेल्या ओंकार बालक आश्रमात गरीब, होतकरू आणि आदिवासी विद्यार्थी मोफत राहतात. शिवाजी हायस्कूलमधील बहुतांश मुले या वसतिगृहात राहतात. त्यापैकी नवव्या वर्गात शिकणारा शुभम दयानंद चलवाड (१५) हादेखील तेथे राहत होता. त्याची आई आणि लहान भाऊ गारखेडा परिसरातील रेणुकानगरात राहतात. काल रविवारची शाळेला सुटी असल्यामुळे शुभम दिवसभर अन्य विद्यार्थ्यांसोबत क्रिकेट खेळला होता. परंतु सायंकाळी त्याला बरे वाटत नसल्यामुळे रात्रीचे जेवण न करताच तो झोपी गेला होता. तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला दवाखान्यात नेण्याऐवजी केवळ बिस्किटे खाऊ घालून झोपी घातले. सोमवारी पहाटे पाच वाजता अभ्यासासाठी सर्व विद्यार्थी उठले व त्यांनी शुभमलाही उठविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो बेशुद्ध असल्याचे आढळले. त्याच्या तोंडातून फेस येत होता व शरीर थंड पडले होते. विद्यार्थ्यांनी त्वरित ही माहिती कर्मचारी व त्याच्या आईला दिली. ही माहिती देण्यात विलंब झाला आणि त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यास सकाळचे ७ वाजले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराने त्याचे निधन झाले असावे, असे मत डॉक्टरांनी नोंदविले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.जयभवानीनगर परिसरातील तिरुपती कॉलनी येथील रहिवासी ऋषिकेश ऊर्फ बॉबी नवनाथ झिंजुर्डे या १४ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार पालकांनी केली असून, यासंदर्भात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.४राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयात इयत्ता आठवीत शिकणारा बॉबी रविवारी सकाळी ८ वाजेपासून घरातून गायब आहे. त्याचे अपहरण झाल्याची तक्रार आज त्याचे वडील नवनाथ झिंजुर्डे यांनी केली. त्यांच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बॉबी हा घरात सर्वात लहान असून, त्याच्यापेक्षा एक मोठा भाऊ आणि बहीणसुद्धा आहे. वडील प्लॉटिंगचा व्यवसाय अनेक वर्षांपासून करतात. रविवारी दिवसभर शहरात मुलाचा शोध घेतला; पण तो कुठेच सापडत नसल्याने पोलीस ठाण्यात धाव घेतल्याचे पालकांचे म्हणणे आहे. ४ यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना नवनाथ झिंजुर्डे यांनी सांगितले की, आमच्या मुलाचे अपहरण झाल्याचा अंदाज आहे. अपहरणकर्ते आम्हाला सांगून थोडेच अपहरण करणार आहेत? पोलीस आणि आम्ही मुलाचा युद्धपातळीवर शोध घेत आहोत.