धक्कादायक! हॅप्पी दिवाळी म्हटल्याने तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 15:41 IST2019-10-28T15:24:25+5:302019-10-28T15:41:06+5:30
हॅप्पी दिवाळी म्हटल्याने झालेल्या वादात एका तरुणाची चौघांनी तलवारीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

धक्कादायक! हॅप्पी दिवाळी म्हटल्याने तरुणाची हत्या
औरंगाबाद - हॅप्पी दिवाळी म्हटल्याने झालेल्या वादात एका तरुणाची चौघांनी तलवारीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री न्यायनगरात ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. सचिन विष्णू वाघ (28) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयित चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
साईनाथ आदिनाथ येढणे, पवन अनिल दिवेकर, निलेश नारायण रांजणे उर्फ सुऱ्याआणि रोहित दिलीप नरवडे अशी संशयित आरोपींची नावे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिनचा भाऊ आणि आरोपीमध्ये रविवारी रात्री हॅप्पी दिवाळी म्हटल्यावरुन वाद झाला. वादानंतर त्यांच्यामध्ये झटापट सुरू झाली ही बाब समजल्यानंतर सचिन भांडण सोडविण्यासाठी धावला असता. आरोपीने त्याच्यावर तलवारीने हल्ला केला व तो पसार झाला. यामध्ये सचिन गंभीर जखमी झाला असल्याने त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सकाळी 10.30 वाजता त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेपासून न्यायनगरात तणाव आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस उपायुक्त राहुल खाडे, सहायक आयुक्त आणि सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली. तसेच पोलीस उपनिरिक्षक विकास खटके आणि कर्मचाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.