गंगापूर तालुक्यात चाकूने वार करत सरपंचांच्या वडिलांचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 18:16 IST2018-09-26T18:16:20+5:302018-09-26T18:16:51+5:30
नातवासह बैलगाडीतून शेतात जाणाऱ्या शेतकऱ्याचा भरदिवसा अज्ञात दोघांनी चाकूने वार करून खून केला
_201707279.jpg)
गंगापूर तालुक्यात चाकूने वार करत सरपंचांच्या वडिलांचा खून
औरंगाबाद : नातवासह बैलगाडीतून शेतात जाणाऱ्या शेतकऱ्याचा भरदिवसा अज्ञात दोघांनी चाकूने वार करून खून केल्याची घटना आज दुपारी १२ ते १ च्या दरम्यान घडली. डोमेगाव शिवारात झालेल्या या घटनेत मयताचा नातू गंभीर जखमी असून त्याच्यावर घाटी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. मयत हे डोमेगाव (ता.गंगापूर) येथील सरपंचांचे वडील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेतील मयत शेतकऱ्याचे नाव दामेधर किसन महारनोर असे आहे तर जखमी नातवाचे नाव दादा महारनोर असून त्याच्यावर औरंगाबादेतील घाटीत रूग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी दोन संशयीतांना वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून वैयक्तीक वादातून झाला कि चोरीच्या उद्देशातून झाला याचा पोलीस तपास करत आहेत.