शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

‘लव्ह लेटर’ पाठवायला महापालिकेचा अधिकारी तुमची प्रेमिका आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 12:45 IST

अवैध वाळूसाठा प्रकरणी तहसीलदारास आयुक्तांनी खडसावले

ठळक मुद्देशहरातील वाळूसाठा जप्तीसाठी तहसीलदारांना घेतले फैलावर

औरंगाबाद : महापालिका आयुक्त आस्तिकुमार पाण्डेय यांनी मंगळवारी सकाळी हडको एन-११ येथे मोठा वाळूसाठा पकडला. हा वाळूसाठा जप्त करावा असे आदेश त्यांनी तहसीलदार किशोर देशमुख यांना दिले. देशमुख यांनी उलट आयुक्तांना सांगितले की, मी मनपा अधिकाऱ्यांना पत्र पाठवितो. त्यावर आयुक्तांचा पारा वाढला. लव्ह लेटर पाठवायला आमचे अधिकारी म्हणजे तुमची प्रेमिका आहे का? यावर तहसीलदार निरुत्तर झाले.

नवनियुक्त आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय दररोज सकाळी वेगवेगळ्या वॉर्डात पाहणीसाठी जात आहेत. मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून त्यांनी सिद्धार्थनगर हडको येथून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. एन-११ भागातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनजवळ आयुक्तांना मोठा वाळूसाठा दिसून आला. आयुक्तांना पाहून वाळूमाफिया फरार झाले. घटनास्थळावरून आयुक्तांनी तहसीलदार किशोर देशमुख यांना फोन केला. तहसीलदारांनी चार दिवसांत कारवाई करतो, महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाला पत्र देतो, असे उत्तर दिले. त्यामुळे आयुक्त संतप्त झाले. मी जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे. मला सर्व माहिती आहे. तुम्हाला लव्हलेटर देण्याची गरज काय? तातडीने कारवाई करा, तुम्हाला महापालिकेचे जेसीबी देतो. ट्रॅक्टर घेऊन या, असे आयुक्तांनी बजावले. सिद्धार्थनगर येथेही वाळूचा साठा आढळून आला. वाळूची रॉयल्टी भरलेली आहे का? याचा शोध घेण्याचे आदेश आयुक्तांनी वॉर्ड अभियंता नितीन गायकवाड यांना दिले. यावेळी नगरसेवक मोहन मेघावाले, वॉर्ड अधिकारी अजमत खान, ए.बी. देशमुख यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

मोठ्या इमारतींना कर नाही सिद्धार्थनगर येथील मोठ्या इमारतींना कर लावलेला नव्हता. बांधकाम परवानगी तरी आहे का? अशी विचारणा आयुक्तांनी केली. त्यावर अधिकाऱ्यांनी हा स्लम परिसर असून, बेकायदा भूखंडावर बांधकामे झालेली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे बांधकाम परवानगी नाही. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करावे, जेणेकरून जागेच्या मालकीसंदर्भात निर्णय घेता येईल, असे आयुक्तांनी नमूद केले. 

तुम्हाला निलंबनाची हौसच आहे का?हडकोतील अनेक वसाहतींमध्ये जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून पाणी वाया जात होते. त्यावर आयुक्तांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. एवढी छोटी कामे करण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकत नाहीत का? मी तुम्हाला निलंबित करावे, असे तुम्हाला वाटते का? तुमची तशी इच्छाच असेल तर निलंबित करतो? असे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना ठणकावले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाsandवाळूMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादTahasildarतहसीलदार