शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पालिका कर्मचाऱ्यांचा संप सातव्या दिवशीही सुरु, शासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: July 22, 2014 00:18 IST

धर्माबाद : विविध मागण्यांसंदर्भात नगरपालिकेतील सर्व कर्मचारी संपावर असल्याने धर्माबाद नगरपालिकेत शुकशुकाट दिसून येत असून सातव्या दिवशीही संप चालूच असल्याने कार्यालयीन कामे ठप्प पडली आहेत़

धर्माबाद : विविध मागण्यांसंदर्भात नगरपालिकेतील सर्व कर्मचारी संपावर असल्याने धर्माबाद नगरपालिकेत शुकशुकाट दिसून येत असून सातव्या दिवशीही संप चालूच असल्याने कार्यालयीन कामे ठप्प पडली आहेत़शहरात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे़ रात्रीला बहुतांश ठिकाणी रस्त्यावरील पथदिवे बंद पडले असून विंचू किड्याची भीती निर्माण झाली आहे़ शहरातील विकासकामे, योजना रेंगाळत पडले असून याचा परिणाम जनतेवर होत आहे़ याची दखल घेण्यासाठी सातव्या दिवशी २१ जुलै रोजी आ़वसंतराव चव्हाण यांनी भेट दिली असता ऩप़ कर्मचाऱ्यांचे शाखा अध्यक्ष धर्मन्ना लखमावाड, रुक्माजी भोगावार, सूर्यकांत मोकले, सुभाष निरावार, भीमराव सूर्यवंशी, सविता जुन्नेवार, सुधाकर कांबळे, विठ्ठल पारेवार, शंकरराव डोप्पलवार, मारोती उल्लेवाड, गुलाम यसदानी, दत्तू गुर्जलवाड, लक्ष्मण झुंजारे, सायन्ना पातरलू, अशोक घाटे, रमाकांत बाचे, वसंत पुतळे, मिर्झा बेग आदींनी आ़चव्हाण यांना निवेदन दिले़ (वार्ताहर)किनवट : संपात किनवट पालिकेचे कर्मचारी सहभागी असल्याने नागरी समस्यांना शहरवासियांना सामोरे जावे लागत आहे़ प्रलंबित मागण्या बुधवारपर्यंत मान्य न झाल्यास शुक्रवारपासून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभीम शेंडगे यांनी किनवट येथे दिला़ नगरपालिका कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्या घेवून १५ जुलैपासून संपात सहभाग घेतला आहे़ तीन कर्मचारी वगळता सर्व ऩप़ कर्मचारी संपात सहभागी झाल्याने नागरी समस्यांचा सामना शहरातील जनतेला करावा लागत आहे़ संपादरम्यान संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभीम शेंडगे, उपाध्यक्ष बाबूराव केंद्रे, जिल्हा सरचिटणीस संजय फुले, संघटक जावेद इनामदार या पदाधिकाऱ्यांनी २१ जुलै रोजी ऩप़ कर्मचाऱ्यांच्या संपाला भेट दिली़ किनवट ऩप़ संघटनेचे रवीचंद्र सुकनीकर, शंकर सावनपेल्लीवार, भगवान भंडारे व इतर कर्मचाऱ्यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला़ यावेळी जिल्हाध्यक्ष बलभीम शेंडगे यांनी बुधवारपर्यंत म्हणजे २३ जुलैपर्यंत प्रलंबित मागण्या शासनाने मान्य न केल्यास २५ जुलैपासून तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभारले जाण्याचे संकेत दिले़ त्यामुळे शासनाची भूमिका काय राहणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे़ (वार्ताहर)