शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी तरी मनपाच्या नोटिसा

By admin | Updated: August 2, 2016 00:26 IST

औरंगाबाद : एक लाखापेक्षा अधिक मालमत्ताकर थकविलेल्या नागरिकांना नोटिसा पाठवून कर अदालतमध्ये चर्चेला बोलावण्याचे काम मनपाने यापूर्वीच सुरू केले आहे.

औरंगाबाद : एक लाखापेक्षा अधिक मालमत्ताकर थकविलेल्या नागरिकांना नोटिसा पाठवून कर अदालतमध्ये चर्चेला बोलावण्याचे काम मनपाने यापूर्वीच सुरू केले आहे. आतापर्यंत दोन कर अदालत यशस्वी झाल्यानंतर प्रशासनाने छोट्या थकबाकीदारांकडे आपला मोर्चा वळविला आहे. वॉर्ड कार्यालयांतर्फे पाच हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात येत आहे. नोटीस पाहून काही नागरिक वॉर्डांमध्ये कराचा भरणा करीत आहेत.शहरातील १ लाख ३१ हजार मालमत्ताधारकांनी सुमारे २९० कोटी रुपये मालमत्ताकराचे थकविले आहेत. मागील ३० वर्षांमध्ये मनपाने कधीच मालमत्ताकराच्या थकबाकीची वसुली केलेली नाही. दरवर्षी थकबाकीचा आकडा फुगत गेला. अलीकडेच या थकबाकीवर २४ टक्के व्याज लावण्याचे अधिकारही शासनाने मनपाला दिले आहेत. पूर्वी मनपाचे अधिकारी सोयीस्करपणे थकबाकीचा आकडा लपवून ठेवत असत. चालू आर्थिक वर्षाची मागणी आणि वसुली या दोनच मुद्यांवर अधिकाऱ्यांचा भर असायचा. अलीकडेच मनपा प्रशासनाने मालमत्ताकराच्या थकबाकीकडे गांभीर्याने लक्ष देणे सुरू केले आहे. आतापर्यंत मोठ्या थकबाकीदारांसाठी दोन कर अदालतीही घेण्यात आल्या. या कर अदालतमध्ये जागेवरच नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात आले. काही मालमत्ताधारकांनी कर अदालतमध्ये पैसे भरून टाकले.मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी यंदा मालमत्ताकरातून २३० ते २५० कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. आतापासूनच मनपाने वेगवेगळ्या प्रकारे तयारी केल्यास मार्चअखेर उद्दिष्ट साध्य होईल, असा अंदाज आयुक्तांचा आहे. करमूल्य व निर्धारण विभागाला पूर्वी पूर्णवेळ अधिकारी नव्हते. आता वसंत निकम यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.ज्यांच्याकडे अगदी दोन ते तीन वर्षांचे पैसे थकले असतील त्यांना नोटीस बजावण्यात येत आहे. मनपाच्या नोटिसा पाहून नागरिक वॉर्ड कार्यालयांमध्ये पैसे भरण्यासाठी गर्दी करीत असल्याचे चित्रही पाहायला मिळाले.