शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

घाटी रुग्णालयाचा ताण मनपा हलका करणार; हडको एन-११ येथील रुग्णालयाचे काम पूर्णत्वाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 19:49 IST

मागील अनेक वर्षांपासून घाटीवरील ताण हलका करण्यासाठी निव्वळ चर्चा होते. आता मनपा सकारात्मक पाऊल उचलत आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहरात महापालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. त्यामुळे घाटी रुग्णालयावर रुग्णसेवेचा ताण वाढत चालला आहे. घाटी प्रशासनाची क्षमता नसतानाही रुग्णसेवा दिली जाते. घाटीवरील हा ताण हलका करण्यासाठी मनपा पुढाकार घेणार आहे. अधिष्ठातांसोबत चर्चा करून मनपा शहरात काही रुग्णालये सुरू करणार आहे. हडको एन-११ येथे स्मार्ट सिटीमार्फत मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

घाटी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज १८०० रुग्ण येतात. विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी १५०० रुग्ण दाखल असतात. घाटीला ११७७ बेडची मंजुरी आहे. अनेक रुग्णांना जमिनीवर गाद्या टाकून उपचार घ्यावे लागतात. सर्वाधिक रुग्ण प्रसूतीसाठी येतात. ग्रामीण आणि शहरी भागातील तब्बल ७० ते ८० महिलांची प्रसूती दररोज याठिकाणी होते. मागील अनेक वर्षांपासून घाटीवरील ताण हलका करण्यासाठी निव्वळ चर्चा होते. आता मनपा सकारात्मक पाऊल उचलत आहे. स्मार्ट सिटीच्या निधीतून एन-११ येथे सुसज्ज मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठी इमारत उभारण्यात आली. १० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या तीन मजली इमारतीत ६२ बेडची व्यवस्था आहे. शस्त्रक्रियागार, जनरल वॉर्ड, आयसीयू, सीटी स्कॅन विभाग, सोनोग्राफी विभाग, ४ खासगी रूम, अपघात कक्ष, पार्किंग अशा सोयीसुविधा आहेत.

३ ऑक्टोबरला होणार बैठकरुग्णालय महापालिका प्रशासनच चालवणार आहे. त्यासाठी घाटी रुग्णालयाची मदतही घेतली जाणार आहे. ३ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात मनपात बैठकही आयोजित केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत कोणते उपचार या रुग्णालयात सुरू करावेत, यावर प्रामुख्याने चर्चा होईल. किती कोटींची यंत्रसामग्री खरेदी होईल, तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी कशा पद्धतीने उपलब्ध करून देणार, आदी मुद्यांवर चर्चा अपेक्षित आहे.

अधिष्ठाता यांच्यासोबत चर्चाघाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्यासोबत लवकरच चर्चा करण्यात येईल. घाटीवरील ताण हलका करण्यासाठी त्यांची मदत घेतली जाईल. त्यानंतर मनपा रुग्णसेवेचा विचार करणार आहे.- जी. श्रीकांत, प्रशासक, मनपा

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका