शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

इंडस्ट्रियल ऑक्सिजनवरील कोरोना रुग्णांपासून ‘म्युकरमायकोसिस’ दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 18:29 IST

Mucormycosis Cases : राज्यात ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल ऑक्सिजन वापरण्यात आला, तेथे केवळ ३२ जणांना म्युकरमायकोसिस झाल्याचे समोर आले.

ठळक मुद्देइंडस्ट्रियल ऑक्सिजन वापरलेल्या ठिकाणी केवळ ३२ रुग्ण म्युकरमायकोसिस रुग्णांवरील अभ्यासातून स्थिती स्पष्ट

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यभरात म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराला काेरोना रुग्णांना तोंड द्यावे लागले. या आजाराला इंडस्ट्रियल ऑक्सिजन हा मुख्यत्वे कारणीभूत असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. यासंदर्भात राज्यात केलेल्या एका अभ्यासात इंडस्ट्रियल ऑक्सिजनच्या तुलनेत नाॅन इंडस्ट्रियल, मेडिकल ऑक्सिजनवरील रुग्णांमध्ये ‘म्युकरमायकोसिस’चे प्रमाण अधिक आढळल्याचे समोर आले आहे.

राज्यात ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल ऑक्सिजन वापरण्यात आला, तेथे केवळ ३२ जणांना म्युकरमायकोसिस झाल्याचे समोर आले. त्याउलट नाॅन इंडस्ट्रियल म्हणजे मेडिकल ऑक्सिजनवरील रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचे प्रमाण जास्त राहिल्याचे सांगण्यात आले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत बहुतांश ठिकाणी सिलिंडरमधील ऑक्सिजनचा वापर झाला. दुसऱ्या लाटेपर्यंत लिक्विड ऑक्सिजनची यंत्रणा ठिकठिकाणी उभी करण्यात आली. दुसऱ्या लाटेत रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज पडली. त्यामुळे उद्योगांना पुरवठा होणारा ऑक्सिजनही अनेक ठिकाणी रुग्णांसाठी वापरण्यात आला. लिक्विड ऑक्सिजन अधिक प्युअर असतो आणि तो रुग्णालये, उद्योग या दोन्ही ठिकाणी वापरला जातो. केवळ उद्योग आणि वैद्यकीयसाठी वापरण्यात येणारे सिलिंडर हे वेगवेगळे असतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.

नाॅन इंडस्ट्रियल ऑक्सिजनचे अधिक रुग्णइंडस्ट्रियल ऑक्सिजनमुळे म्युकरमायकोसिस होत असल्याच्या चर्चेमुळे यासंदर्भात अभ्यास करण्यात आला; पण ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल ऑक्सिजन वापरण्यात आला, तेथील अभ्यासात केवळ ३२ जणांना म्युकरमायकोसिस झाल्याचे समोर आले. त्याउलट ज्या लोकांना नाॅन इंडस्ट्रियल ऑक्सिजन वापरण्यात आला, त्यांना अधिक प्रमाणात म्युकरमायकोसिस झाल्याचे आढळले- डाॅ. तात्याराव लहाने, माजी संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय

अनेक बाबी कारणीभूतम्युकरमायकोसिस होण्यास इंडस्ट्रियल ऑक्सिजन कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. परंतु, त्यासाठी अनेक बाबी कारणीभूत आहेत. ह्युमिडिफायर न बदलणे, त्यासाठी साधेच पाणी वापरणे, अशी अनेक कारणे आहेत.- डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक, औरंगाबाद

औरंगाबादेतील म्युकरमायकोसिस रुग्णांची स्थितीएकूण रुग्ण- १,१६२उपचार सुरू असलेले रुग्ण- १२३रुग्णालयातून सुटी झालेले रुग्ण- ८९४एकूण मृत्यू - १४५

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत औरंगाबादेत ऑक्सिजनची रोजची मागणी- ६० टनइंडस्ट्रियल ऑक्सिजन हा ९९.५ टक्के प्युअरलिक्विड ऑक्सिजन हा ९९.५ टक्के प्युअर.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनAurangabadऔरंगाबाद