खासदार-आमदार तुपाशी, कर्मचारी उपाशी; घाटी रुग्णालयात ढोलताशाच्या तालावर घोषणाबाजी

By संतोष हिरेमठ | Updated: March 16, 2023 20:01 IST2023-03-16T20:01:07+5:302023-03-16T20:01:19+5:30

'एकच मिशन, जुनी पेन्शन' चा जयघोष

MP-MLA starving, staff starving; Chanting slogans to the beat of drums in Ghati Hospital | खासदार-आमदार तुपाशी, कर्मचारी उपाशी; घाटी रुग्णालयात ढोलताशाच्या तालावर घोषणाबाजी

खासदार-आमदार तुपाशी, कर्मचारी उपाशी; घाटी रुग्णालयात ढोलताशाच्या तालावर घोषणाबाजी

छत्रपती संभाजीनगर :  सलग तिसऱ्या दिवशी घाटी रुग्णालयात परिचारिका आणि वर्ग-३, लिपिक वर्ग, तांत्रिक वर्ग, वर्ग- चे कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल सुरूच आहेत. कास्टराईब कर्मचारी  कल्याण महासंघाने आज घाटी रुग्णालयात आगळेवेगळे आंदोलन केले.ढोल, ताशाच्या तालावर 'एकच मिशन, जुनी पेन्शन' चा जयघोष केला. 'आमदार, खासदार तुपाशी, कर्मचारी उपाशी' अशीही घोषणा अगदी लयबद्धपणे देण्यात आली.

अधिष्ठाता कार्यालयापासून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, घाटी प्रवेशद्वार आदी भागात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घाटी रुग्णालयात गुरुवारी संपकरी कर्मचाऱ्यांनी फेरी काढली. यामध्ये ढोल आणि टाळाच्या तालावर 'एकच मिशन, जुनी पेन्शन' चा जयघोष केला. यावेळी 'आमदार, खासदार तुपाशी, कर्मचारी उपाशी' अशी घोषणा अगदी लयबद्धपणे संपकरी कर्मचारी देत होते.

अधिष्ठाता कार्यालयापासून या फेरीला सुरुवात झाली. वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, घाटी प्रवेशद्वार इ. भागांत ही फेरी काढण्यात आली. यामध्ये वर्ग-३, लिपिक वर्ग, तांत्रिक वर्ग, वर्ग-४ चे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही फेरी काढण्यात आली. यावेळी संजय व्यवहारे, प्रेम सातपुते, सुनील हिवराळे, संदीप ढेपे, सचिन गायकवाड, चंद्रप्रकाश इंगळे, राजू गंगावणे आदींची उपस्थिती होती.

Web Title: MP-MLA starving, staff starving; Chanting slogans to the beat of drums in Ghati Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.