उन्हाळ्यात रेनबो कपड्यांची चलती
By Admin | Updated: May 6, 2014 18:27 IST2014-05-06T16:26:08+5:302014-05-06T18:27:25+5:30
सध्या वातावरणात तफावत दिसून येत आहे. कधी वारे वाहतात, ढग दाटून येते आणि मग लगेचच ऊन निघत आहे़ या बदलत्या वातावरणामुळे कोणती फॅशन करावी याबाबत औरंगाबादकर संभ्रमात पडले आहेत.

उन्हाळ्यात रेनबो कपड्यांची चलती
औरंगाबाद, दि. ६ - सध्या वातावरणात तफावत दिसून येत आहे. कधी वारे वाहतात, ढग दाटून येते आणि मग लगेचच ऊन निघत आहे़ या बदलत्या वातावरणामुळे कोणती फॅशन करावी याबाबत औरंगाबादकर संभ्रमात पडले आहेत. युवांना आपल्या वार्डरोबमध्ये सर्व प्रकारच्या कपड्यांना रेडी ठेवावे लागत आहे. यातही रेनबो कपड्यांचे आकर्षण वाढताना दिसत आहे़
सिम्पल, पण एलिगंट लूक
उन्हाळा सुरू झाला न झाला आपण विचार करू लागतो तो उन्हाळ्याच्या सुट्टीचा. त्याच अनुषंगाने सुट्टीत भेट देणार्या निळ्या समुद्र्राचा आणि शांत, निर्मळ निळसर आकाशाचा. म्हणूनच या सुट्टीच्या सीझनमध्ये आकाशी निळा, समुद्रासारखा निळा रंग नक्कीच आपल्या व्यक्तिमत्त्वात भर घालेल़ हीच खरी वेळ आहे आपल्या कपाटातल्या निळ्या कपड्यांना काळ्या किंवा पांढर्या ट्राऊजर्स किंवा स्कर्टसोबत मॅचअप करून ऑफिससाठी परफेक्ट लूक मिळविण्याची. त्याचबरोबर सुट्ट्यांमध्ये तुम्ही जॉर्जेट किंवा कॉटनचा मॅक्सी ड्रेस जरूर घालू शकता. तो तुम्हाला सिम्पल पण एलिगंट आणि सोफिस्टकिटेड लूक देईल. या सुट्ट्यांच्या महिन्यात काही गोष्टी न विसरता तुमच्या कपाटात ठेवा. जसं, कॉटनचे मॅक्सी ड्रेस आणि त्यावर चढवायला काही श्रग्स, कॉटन जॅकेट्स, स्कर्टस् आणि त्यावर घालायला साधी बेसिक टॉप्स आणि जॅकेट्स, हॉल्टर टॉप्स किंवा हाय-लो ट्युनिक टॉप्स आणि त्याखाली घालण्याजोग्या पायापाशी घट्ट असणार्या पँट्स. या कपड्यांसोबत तुम्ही फ्लॅट सँडल्स, स्लिंग बॅग्ज आणि सुंदर हॅट घालू शकता.
लेगिंग्ज, ट्युनिक्स वापरा
पुढच्या महिन्यात पावसाळा लागणार आहे़ जेव्हा सगळं जग मुसळधार पावसाने भिजलं असेल तेव्हा तुम्ही मात्र आपल्या फॅशन स्टेटमेंटने त्यांचं लक्ष वेधून घेऊ शकता. पावसाचा मौसम आल्यानंतर न उडणारे आणि बंदिस्त असे ड्रेस जास्त वापरावे लागतील.