मुस्लिम समाजातर्फे ठिकठिकाणी आंदोलन

By Admin | Updated: October 19, 2016 01:10 IST2016-10-19T00:55:57+5:302016-10-19T01:10:05+5:30

पैठण : मुस्लिम समाजास आरक्षण देण्यात यावे व मुस्लिम पर्सनल लॉमध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये, या प्रमुख मागणीसाठी आज जमियत उलेमा हिंद या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने

Movement of the Muslim community | मुस्लिम समाजातर्फे ठिकठिकाणी आंदोलन

मुस्लिम समाजातर्फे ठिकठिकाणी आंदोलन


पैठण : मुस्लिम समाजास आरक्षण देण्यात यावे व मुस्लिम पर्सनल लॉमध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये, या प्रमुख मागणीसाठी आज जमियत उलेमा हिंद या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने येथील शिवाजी चौकात मंगळवारी दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो मुस्लीम बांधवांनी हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्वच आंदोलनात शिस्त व संयम दिसला.
येथील शिवाजी चौकात जमियत उलेमा हिंदचे अध्यक्ष मौलाना नदीम सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण तालुका अध्यक्ष मौलाना अन्सार मिल्ली, सचिव ईनामोद्दीन अन्सारी, उपाध्यक्ष काझी कलिमुल्ला, रफिक कादरी, हसनोद्दीन कट्यारे, राजूभाई वीटभट्टीवाले, शहर ए काझी काझी फजलुल्ला, हमीदखान सर, आजिम कट्यारे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली भूमिका मांडून सरकारी हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी केली. मागण्यांचे निवेदन तहसिलदार किशोर देशमुख यांना पदाधिकाऱ्यांनी जाऊन दिले. या आंदोलनात काझी ईनायत उल्ला, असनोद्दीन अन्सारी, वसीम शेख, ऐहसान कादरी, हाजी अकबर साहेब, मेहमूद खतिब, मुश्ताक कुरैशी, हाफिज गाझी, साहेर बागवान, शेख ईरफान, मौलवी सिराज, मौलाना जावेद, अन्नुभाई धांडे, यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.
गंगापूर : येथे जमीयत उलेमा हिन्दच्या वतीने गंगापूर शहर व परिसरातील मुस्लिम बांधवानी मुस्लिम समाजासाठीचे हक्काचे आरक्षण मिळावे या मागणीकरीता शांततेत मोर्चा काढून तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले.
१८ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता गंगापूर शहरातील पोस्ट आॅफिस कार्यालयजवळील शादीखाना येथून प्रत्यक्षात मोर्चास प्रारंभ करण्यात आला. या मोर्चात शहरातील मुस्लिम बांधवांनी शांततेच्या मार्गाने मोर्चात स्वयंप्रेरणेने सहभाग घेतला. शहरातील पोस्ट आॅफिस कार्यालयजवळील शादी खाना येथे मुस्लिम बांधव एकत्र आले. तरुणांनी हातात जमीयत उलेमा हिन्दचा झेंडा व विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चाला सुरुवात केली. एकमिनार चौक, तिन कोनी, राजीव गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसीलच्या दिशेने मार्गस्थ होत असताना शहरातील विविध धर्मातील नागरिकांच्या वतीने मोर्चातील मुस्लिम बांधवांना पिण्याचे पाणी व बिस्किट देण्यात आले. मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यावर मौलवी उलेमा यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण का मिळावे या बाबत मार्गदर्शन केले. तहसील कार्यालयासमोर ३ तास हे आंदोलन सुरु होते. आंदोलकांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना विविध मागण्याचे निवेदन देऊन आपल्या भावना शासन दरबारी कळवाव्या, अशी विनंती केली. उपविभागीय पोलीस अधिकारी शरद बरडे, पोलीस निरीक्षक मुकुंद अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा मार्गात वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुस्लिम समाज या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाला होता तर इतर समाजातील पदाधिकारी व नागरिक देखील या मोर्चादरम्यान सहभागी झाले होते. यातील अनेकांनी मुस्लिम समाजाची मागणी रास्त असून ती शासनाने पूर्ण करावी, अशी मागणी केली. येणाऱ्या काळात ही मागणी लावून धरण्यात येणार असून सदर मागणी तातडीने मार्गी लागली नाही तर जमीयत उलेमा हिन्दतर्फे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला .
वैजापूर : येथेही आपल्या विविध मागण्यांसाठी मुस्लिम समाजाने उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते.
यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने तहसीलदार सुमन मोरे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात मुस्लीम समाजाला शैक्षणिक विभागात नोकऱ्यांमध्ये, व्यवसायात आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आलीे. या आंदोलनात शहरातील व तालुक्यातील बहुसंख्य मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. या आंदोलनाला सकल मराठा समाजातर्फे पाठिंबा देण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष साबेर खान, अकील शेख, मजीद कुरैशी, अब्दुल बागवान, अहेमद पठाण, हमीद कुरैशी, फेरोज पठाण, अल्ताफ बाबा, राजू काजी, राफे हसन, हाजी गणी, शेख, सय्यद इलियास, जाफर शेख, राजू गनी शेख, एराज शेख, मेराज शेख, रियोजोद्दीन शेख, वाहेद पठाण, राजू पठाण, नदीम शेख, आमिर अली, हाजी अजगर शेख, सलीम वैजापुरी, राजू कुरैशी, दानिश पटेल, आवेज शेख आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधव हजर होते.

Web Title: Movement of the Muslim community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.