जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे आंदोलन
By Admin | Updated: July 2, 2014 00:15 IST2014-07-02T00:02:51+5:302014-07-02T00:15:25+5:30
परभणी : महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी १ जुलैपासून जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी कामबंद बेमुदत आंदोलन केले.

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे आंदोलन
परभणी : महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी १ जुलैपासून जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी कामबंद बेमुदत आंदोलन केले. यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला. अनेक रुग्णांना उपचाराअभावी परत जावे लागले.
निवेदनात म्हटले आहे की, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामाचे तास केंद्र शासन व इतर राज्याप्रमाणे निश्चित करण्यासंदर्भात निश्चित करावे, सेवांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमासंबंधीत प्रलंबित जिव्हाळ्याचे प्रश्न व सेवेतील कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दृष्टीने आदर्श धोरण ठरविण्यासाठी कारवाई करावी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना एनपीए पूूनश्चय चालू करावे, आरोग्य विभागाचा पूनर्रचना आयोग स्थापन करावा यासह आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेच्या वतीने १ जुलैपासून जिल्हा रुग्णालय परिसरात बेमुदत कामबंद आंंदोलन सुरू केले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गणेश फडणवीस यांंना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनावर डॉ. एस. पी. देशमुख, डॉ. अश्विन पाटील, डॉ. कल्याण कदम, डॉ. आर. एम. काजी, डॉ.ए. एम. पाटील, डॉ. ए. बी. राजूरकर, डॉ. एन. एम. मोरे, डॉ. एस. एम. मोरे, डॉ. एम. आर. दीक्षित, डॉ. अविनाश गोरे, डॉ. पोले, डॉ. तेजस तांबोळी, डॉ. एस. पी. मस्के, डॉ. कल्याण कदम, डॉ. एस. पी. कदम, डॉ. आर. डी. खंदारे, डॉ. ए. पी. पवार, डॉ. ए. ए. जाधव यांच्यासह आदी डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)