शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

तोंडात बोळा कोंबून ‘नकोशी’चा घेतला बळी

By admin | Updated: August 2, 2016 00:27 IST

औरंगाबाद : सिडको येथे महिनाभरापूर्वी बेवारस मृतावस्थेत आढळलेल्या अर्भकाच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे.

औरंगाबाद : सिडको येथे महिनाभरापूर्वी बेवारस मृतावस्थेत आढळलेल्या अर्भकाच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. नकोशी असलेल्या पोटच्या मुलीचा तिच्या निर्दयी मातेने तोंडात बोळा कोंबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्या मातेसह तिची प्रसूती करणाऱ्या दाईला अटक केली आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद पोलिसांच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे बेवारस अवस्थेत आढळलेल्या अर्भकाच्या मातेचा शोध घेण्यात सिडको पोलिसांना यश आले. तपास करणाऱ्या तरबेज पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले तर पोलिसांना मदत करणाऱ्या खबऱ्याला पन्नास हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.अर्भकाची आई बिस्मिल्लाबी वसीम खान (रा. मिसारवाडी, सिडको) आणि दाई शारजा शेख नबी (रा. हर्सूल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलांची नावे आहेत. याविषयी पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, सिडकोतील सनी सेंटरच्या मागे २१ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास स्त्री जातीचे एक नवजात अर्भक बेवारस अवस्थेत आढळले होते. शवविच्छेदनामध्ये अर्भकाच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबून खून करण्यात आल्याचे समोर आले होते. याप्रकरणी सिडको ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी सुरू केला. त्यासाठी शहरातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या डॉक्टरांची बैठक घेऊन २० ते २१ जून रोजी त्यांच्या रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलांची यादी मागविली होती. तसेच शहरातील सर्व सोनोग्राफी सेंटर्स चालकांची बैठक घेऊन जून महिन्यात संभाव्य (पान ५ वर)अशा प्रकरणात पोलिसांना प्रथमच यश...अर्भकाचा खून करून प्रेत बेवारस अवस्थेत फेकण्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. मात्र, अशा गुन्ह्यातील मातेचा शोध घेण्यात पोलिसांना प्रथमच यश आले. त्यासाठी आयुक्तांनी स्वत: पुढाकार घेतला. पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, ज्ञानोबा मुंढे, पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती, स.पो.नि. अर्चना पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार पाडवी, पोलीस उपनिरीक्षक सागर कोते यांनी हा तपास पूर्ण केला. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आणि एक लाखाचे बक्षीस देण्याची घोषणा आयुक्तांनी केली.